Headlines

Global Maharashtra Breaking News

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

⚡कणकवली ता.१७-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सिंधुदुर्गमधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये दक्षिण सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी आशिष सुभेदार, दक्षिण सिंधुदुर्ग सचिवपदी संदेश शेट्ये, दोडामार्ग सावंतवाडी तालुका जिल्हा उपाध्यक्ष कौस्तुभ नाईक, वेंगुर्ला –…

Read More

कळसुलकर हायस्कूल येथे वैदिक मँथ कार्यशाळा संपन्न

२६० मुलांनी घेतला लाभ ⚡सावंतवाडी ता.१७-: कळसुलकर हायस्कूल येथे आज वैदिक मॅथ्स कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्राथमिक व माध्यमिक मध्ये शिक्षण घेणाऱ्या एकूण 260 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. गोवा मंगेशी येथील सागर साकोर्डकर यांनी या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.

Read More

भाजपने साजरा केला राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस

कातकरी वस्तीत साड्या, ब्लँकेटचे केले वाटप;महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांची उपस्थिती ⚡वेंगुर्ले ता.१७-: भाजपा वेंगुर्ले च्या वतीने भगवान बिसरा मुंडा यांची जयंती अर्थात ” राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस ” साजरा केला . तालुका कार्यालयात भगवान बिसरा मुंडा यांच्या प्रतिमेचे महीला मोर्चा च्या जिल्हाध्यक्षा सौ.संध्या तेरसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला . त्यानंतर वेंगुर्ले शहरातील…

Read More

मोबाईल टॉवरच्या दीड लाख रुपये किमतीच्या २४ सेल चोरीस

तुळस येथील घटना : वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ⚡वेंगुर्ले ता.१६-: वेंगुर्ले तालुक्यातील तुळस खटारवाडी येथील मोबाईल टॉवरच्या खाली उघड्या शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या सुमारे १ लाख ५५ हजार ५७७ रुपये किमतीच्या बॅटरी बँग मधील २४ सेल चोरीस गेल्या आहेत. या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तुळस येथील ही घटना…

Read More

आजगाव येथे २० नोव्हेंबर रोजी साहित्य प्रेरणा कट्ट्याची सभा

सभेत गीत, कविता, ललित सादरीकरण व पुस्तक प्रकाशन ⚡सावंतवाडी ता.१६सहदेव राऊळ-:* आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याची पंचविसावी सभा रविवार २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता आजगाव वाचनालयात आयोजित करण्यात आली आहे. यात सदस्यांच्या वतीने गीत, कविता, ललित असे सादरीकरण तसेच एका पुस्तकाचे प्रकाशनही होणार आहे.मुलांना साहित्याची गोडी लागावी म्हणून गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील एकेका…

Read More

सागर सुरक्षा कवच मोहिमेत ‘रेड टिम’ला पकडण्यात ‘ब्ल्यु टीम’ला यश

⚡मालवण ता.१६-: सागरी सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून जिल्ह्याच्या किनारपट्टीवर राबवल्या गेलेल्या सागरी सुरक्षा कवच मोहिमेची आज सांगता झाली. या मोहिमेत पोलिसांच्या ब्ल्यू टीमचा बंदोबस्त भेदण्याचा प्रयत्न करणाऱ्या रेड टीमचा हा प्रयत्न ब्ल्यू टीमने हाणून पाडत रेड टीमला पकडण्याची मोहीम फत्ते केली. सागरी सुरक्षा यंत्रणेची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या ‘सागर कवच’ मोहिमेस कालपासून प्रारंभ झाला होता. यात…

Read More

भक्ती महाजन – आळवे यांना डॉक्टरेट

गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागाने पदवी केली बहाल बांदा/प्रतिनिधीबांदा गावची सुकन्या सौ. भक्ती महाजन-आळवे यांना गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागाची डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे. ‘संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्या साहित्याचा भाषिक व वाङमयीन अभ्यास ‘ हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.गोवा विद्यापीठाच्या माजी विभागप्रमुख डॉ. सुनीता उम्रसकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. भक्ती आळवे यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन…

Read More

मंदार लुडबे, सुशील घाडीगांवकर यांच्यावर युवा मोर्चाची नवी जबाबदारी

जिल्हाध्यक्ष आनंद सावंत यांनी केल्या निवडी जाहीर मालवण (प्रतिनिधी) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने ग्रामीण भागात सक्षमपणे कार्यरत असणाऱ्या युवा पदाधिकाऱ्यांवर संघटनात्मक जबाबदारी दिली आहे. यामध्ये मंदार संजय लुडबे यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या मालवण शहर प्रभारी आणि ग्रामीण तालुका मंडल प्रभारी तर सुशांत सुनील घाडीगावकर यांची आचरा मंडल तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजयुमोचे…

Read More

विश्वनाथ गोसावी यांना भाजपच्या मळगाव बुथ क्र. १५७ चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते देण्यात नियुक्तीपत्र ⚡सावंतवाडी ता.१६सहदेव राऊळ -: मळगाव येथील विश्वनाथ भिकनाथ गोसावी यांना भारतीय जनता पार्टीच्या मळगाव येतील बुथ क्र. १५७ चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र गोसावी यांना भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते देण्यात आले आहे. यावेळी मळगाव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, निरवडे…

Read More

भाजप महिला आघाडी मालवण तालुकाध्यक्षपदी सौ. पूजा करलकर यांची निवड

⚡मालवण ता.१६-: भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी मालवण तालुकाध्यक्षपदी माजी नगरसेविका सौ. पूजा प्रमोद करलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष सौ. संध्या तेरसे यांच्या अध्यक्षतेखाली येथील तालुका कार्यालयात आयोजित बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली आहे. भाजपाच्या महिला आघाडीची बैठक मालवण येथील तालुका कार्यालयात सौ. संध्या तेरसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला महिला…

Read More
You cannot copy content of this page