भाजप महिला आघाडी मालवण तालुकाध्यक्षपदी सौ. पूजा करलकर यांची निवड

⚡मालवण ता.१६-: भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी मालवण तालुकाध्यक्षपदी माजी नगरसेविका सौ. पूजा प्रमोद करलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष सौ. संध्या तेरसे यांच्या अध्यक्षतेखाली येथील तालुका कार्यालयात आयोजित बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली आहे.

भाजपाच्या महिला आघाडीची बैठक मालवण येथील तालुका कार्यालयात सौ. संध्या तेरसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला महिला जिल्हाध्यक्षा सौ. तेरसे यांच्यासह भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी मार्गदर्शन केले. बैठकीला महिला आघाडी शहर अध्यक्षा सौ. चारुशीला आचरेकर, सौ. सरोज परब, सौ. ममता वराडकर, सौ. रश्मी लुडबे, सौ. तारका चव्हाण, ममता पराडकर, विजया चव्हाण, सिमा गावडे, कुडाळ शहर उपाध्यक्ष मुक्ती परब यांच्यासह अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खरेदी विक्री संघातील आबा हडकर, महेश मांजरेकर, सौ. सरोज परब, कृष्णा ढोलम आदी नवनियुक्त संचालकांचा सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page