⚡वेंगुर्ला ता.१६-: राज्यात तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था वेंगुर्ला येथे सहकार मेळाव्याचे आयोजन केले आहे.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा सहकार मंडळाचे अध्यक्ष गजानन सावंत, ज्येष्ठ नेते एम.के.गावडे तसेच सहकार क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सर्व सहकार प्रेमी व विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महिला काथ्या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब यांनी केले आहे.
