मोबाईल टॉवरच्या दीड लाख रुपये किमतीच्या २४ सेल चोरीस

तुळस येथील घटना : वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

⚡वेंगुर्ले ता.१६-: वेंगुर्ले तालुक्यातील तुळस खटारवाडी येथील मोबाईल टॉवरच्या खाली उघड्या शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या सुमारे १ लाख ५५ हजार ५७७ रुपये किमतीच्या बॅटरी बँग मधील २४ सेल चोरीस गेल्या आहेत. या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळस येथील ही घटना ९ नोव्हेंबर सायंकाळी ७ ते १० नोव्हेंबर सकाळी ४ या या दरम्यान घडली आहे. याबाबत सत्यवान गुरुनाथ साळगावकर (गाडीअड्डा वेंगुर्ला) यांनी वेंगुर्ले पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार वेंगुर्ले पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस रंजिता चौहान करीत आहेत.

You cannot copy content of this page