मंदार लुडबे, सुशील घाडीगांवकर यांच्यावर युवा मोर्चाची नवी जबाबदारी

जिल्हाध्यक्ष आनंद सावंत यांनी केल्या निवडी जाहीर

मालवण (प्रतिनिधी)

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने ग्रामीण भागात सक्षमपणे कार्यरत असणाऱ्या युवा पदाधिकाऱ्यांवर संघटनात्मक जबाबदारी दिली आहे. यामध्ये मंदार संजय लुडबे यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या मालवण शहर प्रभारी आणि ग्रामीण तालुका मंडल प्रभारी तर सुशांत सुनील घाडीगावकर यांची आचरा मंडल तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत श्री. सावंत यांनी या निवडी जाहीर करून त्याबाबतचे पत्र दोन्ही नवनियुक्त युवा पदाधिकाऱ्यांना सुपूर्द केले.

भारतीय जनता युवा मोर्चा ची बैठक जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांच्या अध्यक्षते खाली मंगळवारी येथील भाजपा कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत मालवण तालुका प्रभारी (ग्रामीण व शहर मंडल) या पदावर मंदार संजय लुडबे तर मालवण तालुका (आचरा मंडल) तालुकाध्यक्षपदी सुशांत सुनील घाडीगांवकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आचरा मंडल कार्यक्षेत्रात आचरा, आडवली मालडी, मसुरे या जिल्हा परिषद मतदार संघांचा समावेश आहे. आनंद (भाई) सावंत यांनी मंदार व सुशांत यांना नियुक्तीपत्र दिले आहे. पक्षाच्या संघटनात्मक वाढ व विकासासाठी आपले योगदान महत्वाचे असणार आहे, असेही नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजयुमो शहराध्यक्ष ललित चव्हाण, विक्रांत नाईक यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page