Headlines

Global Maharashtra Breaking News

देसाई स्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिन साजरा

⚡वेंगुर्ला ता.२३-: शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित वेंगुर्ला येथील प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये महान गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुज यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त गणित विषयक प्रदर्शन व प्रतिकृतीचे आयोजन करण्यात आले होते.

Read More

प्रशिक्षण, पूर्वतयारीमुळे आपत्तीची तीव्रता कमी-:

प्रजित नायर* ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२३-: आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी असेल तर, येणाऱ्या आपत्तीची तीव्रता कमी करण्यास मदत होते. त्यामुळे प्रशिक्षण आवश्यक असते, असे प्रतिप्रादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्यावतीने प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आज उद्घाटन झाले.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री….

Read More

सेवापुस्तिका जतनासाठी पं. स. कणकवलीला दोन कपाटांची भेट

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनने केली आश्वासनपूर्ती ⚡कणकवली ता.२३-: कणकवली तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनच्यावतीने कणकवली पंचायत समिती शिक्षण विभागाला दोन स्टील कपाटे भेट देण्यात आली. पंचायत समितीच्यावतीने गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी त्यांचा स्विकार करुन सेवानिवृत्त शिक्षकांच्या या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करुन धन्यवाद दिले. गत तालुका पेन्शन अदालतीमध्ये पेन्शनसंबंधी विविध प्रश्नांचा उहापोह होत असताना शिक्षकांच्या…

Read More

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केला कलमठ सरपंच संदीप मेस्त्री व सदस्यांचा सत्कार

⚡कणकवली ता.२३-: कलमठ ग्रामपंचायत सरपंचपदी निवडून आलेले संदीप मेस्त्री व सदस्य यांचा नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभी मुसळे, शिशिर परूळेकर, संजय कामतेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.भाजपचे सरपंच पदाचे उमेदवार संदीप मेस्त्री यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवत शिवसेनेच्या सरपंच पदाचे उमेदवारापेक्षा मोठे मताधिक्य मिळवल्याने नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी संदीप मेस्त्री यांचा विशेष सत्कार…

Read More

विद्यामंदिर कणकवलीची तनिष्का आडीलकर बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

⚡कणकवली ता.२३-:क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय, ओरोस यांच्यामार्फत आयोजित कणकवली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा व जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत प्रशालेच्या तनिष्का आडीलकर (प्रथम) वैष्णवी तवटे (द्वितीय) यांनी यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.सदर यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक अच्युतराव वनवे व सुधीन पेडणेकर…

Read More

फोंडाघाटच्या नूतन सरपंच संजना संजय आग्रे यांचा सत्कार

⚡कणकवली ता.२३-: फोंडाघाट ग्रामपंचायत सरपंचपदी निवडून आलेल्या सौ. संजना संजय आग्रे यांचा बाळासाहेबांची शिवसेना महिला पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. फोंडाघाट येथील ग्रामस्थांनी विश्वास टाकून आपल्यासह आपल्या सहकाऱ्यांना निवडून दिल्याने आता आमची जबाबदारी वाढली आहे. यापुढे गावचा विकास डोळ्यासमोर ठेवून पुढील प्रवास राहील, असा विश्वास सौ.आग्रे यांनी व्यक्त केला. बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे…

Read More

कणकवलीत उड्डाणपूल दुरुस्तीचे काम पाडले बंद

तावडे यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची केली मागणी ⚡कणकवली ता.२३-: हायवे ठेकेदाराच्या चुकीमुळे विजेचा शॉक लागून बाळकृष्ण तावडे यांचा मृत्यू झाला असून नुकसान भरपाई द्या आणि नंतरच काम करा असा इशारा देत भाजपा नगरसेवक शिशिर परुळेकर, महेश सावंत यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी काम बंद ठेवण्यास भाग पाडले.कणकवली एस.एम.हायस्कूल समोरील उड्डाणपूल दुरुस्तीचे काम दिलीप बिल्डकाँन कंपनीने हाती घेतले…

Read More

शालेय विभागीय कॅरम स्पर्धेत आरपीडीचा मयुरेश नाईक उपविजेता

राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड ⚡सावंतवाडी ता.२३सहदेव राऊळ -: रत्नागिरी येथे झालेल्या शालेय विभागीय कॅरम स्पर्धेत १९ वर्षाखालील गटात आर. पी. डी.हायस्कूलचा विद्मार्थी मळगाव गावचा सुपुत्र कु. मयुरेश तुळशीदास नाईक उपविजेता ठरला. त्याची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत निवड झाली आहे. त्याने या अगोदर तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धेत प़थम क़माक पटकविला होता,तसेच त्याने या अगोदरपण राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार…

Read More

दांडेलीत जलजीवन मिशनच्या कामांचा शुभारंभ

⚡बांदा ता.२३-: दांडेली गावातील ग्रामस्थांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी ग्रामपंचायतच्या पुढाकारातून जलजीवन मिशन अंतर्गत नळपाण्याच्या टाकीचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच नळयोजनेची जीर्ण पाईपलाईन अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना वेळेत व मुबलक पाणीपुरवठा करणे शक्य होणार असल्याचे दांडेली सरपंच दादा पालयेकर यांनी सांगितले. दांडेली येथे जलजीवन मिशन अंतर्गत आराखड्यातील कामांचे भूमिपूजन आरोस येथील जमीन…

Read More

साटेलीत नियोजन अभावी मायनिंगचा शेती-बागायतीला धोका

शेतकरी संजय नाईक यांचा प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा ⚡बांदा ता.२३-: सिंधुदुर्गातील रेडी, तिरोडा, साटेली, कळणे या लोहखनिजाच्या खाणीत सोने व प्लॅटेनियमचा अंश असल्याची चर्चा सर्वत्र असल्याने मोठमोठ्या कंपन्यांचे लक्ष या गावांकडे लागून आहेत. त्यामुळे भविष्यात साटेली(सावंतवाडी) गावात पुन्हा कोणतेही नियोजन न करता मायनिंग सूरू झाल्यास ग्रामस्थांसह पाळीव जनावरांनाही धोकादायक ठरू शकते. प्रशासनाने याची दखल घेण्यासाठी…

Read More
You cannot copy content of this page