शालेय विभागीय कॅरम स्पर्धेत आरपीडीचा मयुरेश नाईक उपविजेता

राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

⚡सावंतवाडी ता.२३सहदेव राऊळ -: रत्नागिरी येथे झालेल्या शालेय विभागीय कॅरम स्पर्धेत १९ वर्षाखालील गटात आर. पी. डी.हायस्कूलचा विद्मार्थी मळगाव गावचा सुपुत्र कु. मयुरेश तुळशीदास नाईक उपविजेता ठरला. त्याची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत निवड झाली आहे.

त्याने या अगोदर तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धेत प़थम क़माक पटकविला होता,तसेच त्याने या अगोदरपण राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. त्याला योगेश फणसळकर, हरीष नार्वेकर यांचे लहानपणापासून मार्गदर्शन लाभले. त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page