⚡वेंगुर्ला ता.२३-: शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित वेंगुर्ला येथील प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये महान गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुज यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त गणित विषयक प्रदर्शन व प्रतिकृतीचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन बॅ.खर्डेकर कॉलेजचे प्रा.सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रा.नवत्रे, मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. गणित शिक्षक मिशाळ यांनी जागतिक गणित दिनाचे महत्त्व व उद्देश याबद्दल मुलांना मार्गदर्शन केले. मुलांनी तयार केलेल्या गणित विषयक विविध प्रतिकृतींचे प्रमुख पाहुण्यांनी परिक्षण केले. या प्रतिकृती पाहून पाहुण्यांनी मुलांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यांचे सहकार्य लाभले. शिक्षक वेंगुर्लेकर यांनी आभार मानले.
