भ्रष्टाचारमुक्त कारभार करा-शंकर कांबळी

शिरोड्यात महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित सरपंच सदस्यांचा सत्कार

⚡वेंगुर्ला ता.२३-: तालुक्यातील शिरोडा ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडीने आपला करिश्मा दाखवत सत्ताबदल करून भाजपला धक्का देत सरपंच व ८ सदस्य निवडून आणले. याबद्दल गावच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

येथील माऊली सभागृहात हा सत्कार कार्यक्रम २१ डिसेंबर रोजी संपन्न झाला. यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब, पंचायत समितीचे माजी उपसभापती सिद्धेश परब, जिल्हा बँक माजी संचालक राजन गावडे, शिवसेना शहर प्रमुख अजित राऊळ, माजी उपसरपंच प्रविण धानजी, माजी ग्रामपंचायत सदस्य आजू अमरे, ग्रामस्थ दिगंबर परब, बावी गावडे, संदीप गावडे, युवक काँग्रेस अध्यक्ष जगन्नाथ गावडे, श्री.पडवळ, प्रमोद नाईक, अमोल परब यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

  यावेळी नवनिर्वाचित सरपंच लतिका रेडकर, सदस्य चंदन हाडकी, अनिश्का गोडकर, प्रथमेश परब, राजन धानजी, नंदिनी धानजी, पांडुरंग  नाईक, रश्मी डिचोलकर, शितल नाईक यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच या सर्वांना निवडून आणण्यासाठी मेहनत घेतलेल्या माजी आमदार शंकर कांबळी, सिद्धेश परब व संदीप गावडे आणि सहकारी यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

  शिरोड्यातील जनतेने आपल्यावर विश्वास ठेवून सर्व समाज एकत्र आल्याने हा विजय मिळाला आहे. यामुळे ग्रामपंचायत्मध्ये भ्रष्टाचारमुक्त कारभार करणे ही तुमची सर्वांची जबाबदारी आहे, असे माजी आमदार शंकर कांबळी यांनी सांगत पुढील उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सर्वजण एकत्र राहून आपलाच उपसरपंच विराजमान करू अशी शपथ नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांना दिली.
You cannot copy content of this page