⚡कणकवली ता.२३-:
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय, ओरोस यांच्यामार्फत आयोजित कणकवली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा व जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत प्रशालेच्या तनिष्का आडीलकर (प्रथम) वैष्णवी तवटे (द्वितीय) यांनी यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.सदर यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक अच्युतराव वनवे व सुधीन पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या चेअरमन डॉ. साळुंखे, सेक्रेटरी बाळासाहेब वळंजू , अध्यक्ष दत्तात्रय तवटे, विश्वस्त अनिलपंत डेगवेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक भारत सरवदे, पर्यवेक्षक पी. जे. कांबळे तसेच सर्व शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले.
