Headlines

Global Maharashtra Breaking News

मनसेच्या पाठपुराव्यानंतर झाराप पत्रादेवी बायपासचे नुतनीकरण काम सुरू

सुधीर राऊळ यांनी वेधले लक्ष : वाहनधारकांकडून समाधान व्यक्त ⚡सावंतवाडी ता.२१-: मुंबई-गोवा झाराप पत्रादेवी बायपासचे नुतनीकरण काम सुरू करण्यात आले आहे. मळगाव येथील टप्प्याचे काम महामार्ग प्राधिकरणाने सुरू केले आहे. याबाबत मनसेचे पदाधिकारी सुधीर राऊळ यांनी लक्ष वेधले होते. अखेर त्यांच्या पाठपुराला यश आला असून वाहनधारकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

Read More

माजगाव केंद्र शाळा १ मध्ये आजपासून श्रमसंस्कार शिबिर

सायंकाळी राजेसाहेब श्रीसंत खेमसावंत भोसले, सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद्र मेंगडे यांच्याहस्ते होणार उद्घाटन.. ⚡सावंतवाडी ता.२१-: माजगाव ग्रामपंचायत व श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने 21 ते 27 पर्यंत 7 दिवस निवासी श्रीमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर माजगाव जिल्हा परिषद केंद्र शाळा नंबर १ येथे आयोजित करण्यात…

Read More

पाच पायांच्या बैलाची कारीवडे गावात प्रवेश

मंगेश तळवणेकर रवी परब यांनी चारा, पाण्याची केली व्यवस्था;बैल कोणाचा असल्यास संपर्क साधण्याचे केले आवाहन ⚡सावंतवाडी ता.२१-: ओटवणे येथे गेले आठ दिवस वास्तव्यास असलेल्या पाच पायांच्या बहुचर्चित बैलाने गुरुवारी सकाळी कारीवडे गावात एन्ट्री करत सर्वांचेच लक्ष वेधले. यावेळी पाठीवर पाचवा पाय असलेल्या या बैलाच्या चारा व पाण्याची व्यवस्था सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर तसेच रवी परब…

Read More

दिलीप भालेकर यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल परीट समाजातर्फे सत्कार

⚡सावंतवाडी ता.२१-: परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांना अखिल भारतीय धोबी परीट महासंघाच्या वतीने राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सावंतवाडी तालुका परीट समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार परीट समाजाचे तालुकाध्यक्ष राजू भालेकर व माजी अध्यक्ष मनोहर रेडकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत परीट समाजाची तालुक्याची मीटिंग घेण्यात…

Read More

आंबोली घाटात चारचाकी गाडीला अपघात…

पोलीस घटनास्थळी दाखल; चालक किरकोळ जखमी.. ⚡सावंतवाडी ता.२१-: पुणे ते गोवा असा प्रवास करीत असताना आंबोली घाटात चार चाकी चा अपघात घडला यात चालक अमेय लग्नात राहणार पुणे हे किरकोळ जखमी झाले आंबोली घाटातील नानापाणी येथे आज रात्री 11 च्या सुमारास हा अपघात घडला जखमी चालकावर सावंतवाडी रुग्णालयात उपचार करण्यात आले घटनास्थळी पोलीस धुमाळे व…

Read More

राजापूर अर्बन बँकेसाठी भाजप पुरस्कृत पॅनलचे उमेदवार जाहीर

संजू परब, अजय गोंदावळे यांच्या उपस्थितीत उमेदवारांनी घेतली केंद्रीयमंत्री राणे यांची भेट ⚡सावंतवाडी ता.२०-: राजापूर अर्बन को – ऑप. बँक लि. राजापूर पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाले असून, भाजप पुरस्कृत सहकार पॅनलच्या उमेदवारांनी आज माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आज भेट घेत त्यांचे मार्गदर्शन घेतले आहे. सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा प्रवक्ते…

Read More

सावंतवाडी येथील पत्रकार क्रिकेट स्पर्धेचा वेंगुर्ले संघ मानकरी

सावंतवाडी पत्रकार संघ उपविजेता ⚡सावंतवाडी ता.२०-: येथील पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे मानकरी वेंगुर्ला पत्रकार संघ ठरला तर सावंतवाडी पत्रकार संघ उपविजेता ठरला. ही स्पर्धा सावंतवाडी पत्रकार संघ आणि इडमिशन या संस्थेच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते.

Read More

अडीज वर्षात डिझेल परतावा मिळवून देवू न शकणाऱ्या आ नाईकांच्या टिल्लू पिल्लूनी फुकाचे श्रेय घेवू नये

ट्रॉलर मालक संघटना अध्यक्ष अशोक तोडणकर यांची टीका मालवण दि प्रतिनिधीराज्य सरकारने मच्छीमारांना मंजूर केलेला डिझेल परतावा हा केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आम. नितेश राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला असून विरोधकांनी याचे फुकाचे श्रेय घेऊ नये. आम. वैभव नाईक यांना अडीज वर्षाच्या सत्ताकाळात डिझेल परतावा मिळवून देता…

Read More

पौष्टिक तृणधान्य वर्षनिमित्त माणगाव बेनगाव माध्यमिक विद्यालयात प्रभातफेरी

आहाराचे फायदे विषयावर करण्यात आले मार्गदर्शन बांदा/प्रतिनिधीआंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या कार्यक्रमांतर्गत आज कोकण कला व शिक्षण विकास संस्था, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, सिंधुदुर्ग व श्री देवी यक्षिणी माध्यमिक विद्यालय माणगाव-बेनगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री देवी यक्षिणी माध्यमिक विद्यालय माणगाव बेनगाव येथे पौष्टिक तृणधान्य आहाराचे होणारे फायदे या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत प्रभातफेरी काढण्यात…

Read More

डिझेल परतावा आ वैभव नाईक यांच्यामुळे मंजूर

ट्रॉलर मालक तपस्वी मयेकर यांचा दावा मालवण दि प्रतिनिधीमहाराष्ट्र शासनाकडून सिंधुदुर्ग जिह्यातील मच्छिमारांना डिझेल परतावा मंजूर झाला. याचे श्रेय कुडाळ मालवणचे कार्यसम्राट आमदार वैभव नाईक यांचे असल्याचा दावा मालवणचे ट्रॉलर मालक तपस्वी मयेकर यांनी केला आहे श्री मयेकर म्हणाले, नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी डिझेल परतावा संदर्भात आमदार वैभव नाईक यानी तारांकित प्रश्न उपस्थित…

Read More
You cannot copy content of this page