आहाराचे फायदे विषयावर करण्यात आले मार्गदर्शन
बांदा/प्रतिनिधी
आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या कार्यक्रमांतर्गत आज कोकण कला व शिक्षण विकास संस्था, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, सिंधुदुर्ग व श्री देवी यक्षिणी माध्यमिक विद्यालय माणगाव-बेनगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री देवी यक्षिणी माध्यमिक विद्यालय माणगाव बेनगाव येथे पौष्टिक तृणधान्य आहाराचे होणारे फायदे या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसर पाणी वाचावा पाणी वाढवाच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.
यावेळी फक्त घोषणा देऊन विद्यार्थी थांबले नाहीत तर संस्थेच्या पुढाकाराने पाण्याचे महत्व सर्वाना अधोरेखित व्हावे यासाठी शालेय विधार्थ्यांच्या सहकार्याने वनराई बंधारा देखील बांधण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या मार्गदर्शनाने बेनगाव माधामिक विद्यालयात झाली. ज्यामध्ये माणगाव गावच्या सरपंच मनीषा भोसले यांनी पाण्याचे महत्व तर तालुका कृषी अधिकारी अश्विनी घाटकर यांनी तृणधान्याचे आपल्या जीवनातील महत्व याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात मंडळ कृषी अधिकारी प्रवीण कोळी, बेनगाव माधामिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गोविंदराव साटम, कोकण कला संस्थेचे अजिंक्य शिंदे, प्रथमेश सावंत, समीर शिर्के, अवंती गवस, प्रदीप पवार, कुणाल चव्हाण, भावना साटम तसेच सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
फोटो :-
माणगाव येथे वनराई बंधारा बांधण्यात आला.
