ट्रॉलर मालक तपस्वी मयेकर यांचा दावा
मालवण दि प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाकडून सिंधुदुर्ग जिह्यातील मच्छिमारांना डिझेल परतावा मंजूर झाला. याचे श्रेय कुडाळ मालवणचे कार्यसम्राट आमदार वैभव नाईक यांचे असल्याचा दावा मालवणचे ट्रॉलर मालक तपस्वी मयेकर यांनी केला आहे
श्री मयेकर म्हणाले, नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी डिझेल परतावा संदर्भात आमदार वैभव नाईक यानी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी मत्स्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर देताना लवकरच मच्छिमारांना जास्तीत जास्त परतावा देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिह्यासाठी सुमारे ६ कोटी रुपये डिझेल परतावा रक्कम अदा करण्यात आली आहे. यासाठी सर्व मच्छिमार व ट्रॉलर मालक यांच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्यासह मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जाहीर आभार मानत असल्याचे तपस्वी मयेकर यांनी सांगितले
