आता कणकवलीतही विद्युत शव दाहिनीवर मृतदेह दहन

नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली माहिती

⚡कणकवली ता.२०-: निसर्गाचे संवर्धन आणि लाकडाची बचत तसेच प्रदूषण रोखण्यासाठी कणकवली नगरपंचायतने विद्युत शव दाहिनी मिळावी अशी मागणी तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती.कणकवली नगरपंचायत स्मशानभूमीतील या विद्युत शवदाहीनीवर गुरुवारी पहिल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार यशस्वीपणे करण्यात आले.कणकवली शहरातील नागरिकांना पर्यावरणाच्या रक्षणासाठी सहकार्य करावे,असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली.

कणकवली नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी नगरसेवक अभिजीत मुसळे उपस्थित होते.
कोरोना कालावधीत मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या.त्यामुळे तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी विद्युत शवदाहिनी दिल्या होत्या. कणकवली नगरपंचायत स्मशानूमीतील या विद्युत शव दाहीनीवर पहिल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार यशस्वीपणे करण्यात आले.त्यातून अस्थी विसर्जन करण्यासाठी मिळतात.
या मृतदेहाचे दहन प्रक्रियेला २ फुटाचे लाकडाचे तुकडे लागतात, फक्त २० टक्के लाकडे लागतात.अवघ्या दोन तासात मृतदेह दहन प्रक्रिया पूर्ण होते. दहन होत असताना धूर हा प्रक्रिया होऊन बाहेर जातो.त्यामुळे प्रदूषण न होता पर्यावरण रक्षण होते. मृतदेह जाळल्यानंतर राख देखील अल्प प्रमाणात असते.मृतदेहाची राख होत नाही.फक्त कपडे असतात,त्याची राख असते.मृतदेहाचे पुरेसे अस्थी विसर्जन करण्यासाठी मिळतात.हिंदू धर्मातील सर्व विधी करता येतात. त्यामुळे मृतदेह दहनासाठी विद्युत दाहिनीचा वापर करावा.निसर्ग वाचविण्यासाठी नगरपंचायतीला शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे.जिल्ह्यात पहिला मृतदेह कणकवलीत विद्युत दाहिनीत दहन करणे यशस्वी झाले असल्याने नागरिकानी पर्यावरण संवर्धनासाठी त्याचप्रमाणे जवळपास 80 टक्के लाकडांची बचत आणि प्रदूषण मुक्त धूर असल्याने सहकार्य करावे असे आवाहन उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी यावेळी केले.

You cannot copy content of this page