Headlines

Global Maharashtra Breaking News

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तीक रजा-: डॉ. जयकृष्ण फड

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२३-: महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण* *विभाग शिक्षक मतदार संघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित मतदारसंघाच्या निवडणूकीच्या दिवशी सोमवार दि.३० जानेवारी २०२३ रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा मंजुर करण्यात आली आहे. अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिली.

Read More

जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत हितेंद्र कदम याला बेस्ट पोजरचा किताब

⚡बांदा ता.२३-: महाराष्ट्र बॉडी बॉडीबिल्डर्स व सिंधदुर्ग बॉडीबिल्डर्स असोसीएशन यांच्या मान्यतेने फ्युचर फिट आयोजित जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव व मेन फिजिक्स स्पर्धा कणकवली फोंडा येथे संपन्न झाली. या स्पर्धेत दोडामार्ग तालुक्यातील मोरगांव गावचा सुपुत्र हितेंद्र कदम याने या स्पर्धेतील बेस्ट पोजरचा किताब मिळवला रसिकांची मने या स्पर्धेत त्याने जिंकली. या अगोदरही विविध स्पर्धेत यश मिळवून त्याने, दोडामार्ग…

Read More

परबवाडा शाळेचा शतक महोत्सव कार्यक्रम

⚡वेंगुर्ला ता.२३-: वेंगुर्ला येथील जिल्हापरिषद पूर्ण प्राथमिक शाळा परबवाडा नं.१ या शाळेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या शतकपूर्ती निमित्त २६ जानेवारी ते २८ जानेवारीपर्यंत शतक महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Read More

वायंगणी गणेश मंदिरात गणेश जयंती

⚡वेंगुर्ला ता.२३-: वायंगणी येथील श्री गणेश मंदिरात गणेश जयंतीचे औचित्य साधून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

Read More

वाफॉली येथे सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा

२६ ते २९ जानेवारी कालावधीत होणार सामने बांदा/प्रतिनिधीसावंतवाडी तालुक्यातील वाफोली येथे “सरपंच चषक” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १५,५५५ रुपये व ५ फूट उंचीचा आकर्षक चषक तर द्वितीय पारितोषिक ११,१११ रुपये व आकर्षक चषक ठेवण्यात आला आहे. प्रवेश शुल्क १५०० रुपये व नोंदणी शुल्क १००० रुपये ठेवण्यात आले आहे. इतर…

Read More

पिंगुळी साईमंदिरं नजीक दुचाकी, चारचाकीत अपघात

गंभीर दुचाकीस्वाराला हलविले रुग्णालयात ;वाहतूक शाखेच्या पोलिसांनी केले तात्काळ दाखल ⚡कुडाळ ता.२३-: येथील पिंगळी साई मंदिर जवळ झालेल्या चारचाकी व दुचाकी अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचारी एम.सावळ, एस.एस. डी आय मेस्त्री, एस एम जाधव यांनी धाव घेत तात्काळ दुचाकी स्वाराला कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. आता जखमेची प्रकृती स्थिर असल्याची…

Read More

कणकवलीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार बाचाबाची

पाईपलाईन फुटल्याने रस्ता खचल्याचे निमित्त;वातावरण तापले ⚡कणकवली ता.२३-: कणकवली शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील पाईपलाईन फुटल्याने रस्ता खचल्याच्या कारणावरून कणकवलीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली.दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली.शिवसेना कणकवली शहरप्रमुख उमेश वाळके व ठेकेदार जावेद शेख यांच्यात जोरदार वाद झाला.त्यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे व नगरसेवक सुशांत नाईक यांनी मध्यस्थी करून दोघांनाही बाजूला केले.मात्र या…

Read More

बांदा गणेशनगर येथे गणेश जयंती उत्सव

⚡बांदा ता.२३-: बांदा वाफोली मार्गावर गणेश नगर येथे असलेल्या श्री गणेश मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.सर्वभक्तगणांना सुख, समृद्धी व चांगले आरोग्य लाभावे यासाठी २४ जानेवारी २०२३ रोजीसकाळी ९ ते दु. २ या वेळेत‘गणेशयाग’ कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले आहे.बुधवार दि. २५ जानेवारी २०२३ रोजीमाघी गणेश जयंती सोहळा पहाटे आरंभ होईल.या निमित्त…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंजूर विकास कामांवरील स्थगिती उठवा

आ. वैभव नाईक यांची राज्याच्या मुख्य सचिवांकडे मागणी ⚡कणकवली ता.२३-: महाविकास आघाडी सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंजूर केलेल्या परंतु सध्याच्या राज्य सरकारने स्थगिती दिलेल्या विकास कामांवरील स्थगिती लवकरात लवकर उठवावी अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची भेट घेऊन केली.जनतेच्या हिताच्या दृष्टीने सदर विकास कामे मंजूर करण्यात आलेली…

Read More

नगरवाचनालय कणकवलीतर्फे
25 रोजी स्पर्धाचे आयोजन

⚡कणकवली ता.२३-: राजभाषा मराठीचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन करावे या हेतूने १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन व पंधरवडा साजरा करण्याचा शासन निर्णय आहे. या अनुषंगाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त नगरवाचनालय कणकवली येथे विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.25 जानेवारी रोजी प्रथम सत्र विभाग (आठवी ते नववी)…

Read More
You cannot copy content of this page