नगरवाचनालय कणकवलीतर्फे
25 रोजी स्पर्धाचे आयोजन

⚡कणकवली ता.२३-: राजभाषा मराठीचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन करावे या हेतूने १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन व पंधरवडा साजरा करण्याचा शासन निर्णय आहे. या अनुषंगाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त नगरवाचनालय कणकवली येथे विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
25 जानेवारी रोजी प्रथम सत्र विभाग (आठवी ते नववी) सकाळी 11 वा. मराठी भाषेची शुद्धता’ या विषयावर डॉ. पी. जे. कांबळे यांचे व्याख्यान ,12 वा. इयत्ता पाचवी साठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा व शुद्धलेखन स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत.

या सर्व स्पर्धा कणकवली नगरवाचनालयाच्या सभागृहात होतील. सदर स्पर्धा कणकवली शहरापुरतीच मर्यादित आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन संस्थेचे कार्यवाह महमद हनिफ आदम परिखान यांनी केले आहे.

You cannot copy content of this page