अन्यथा २६ जानेवारी रोजी उपोषण;माजी नगरसेवक विलास जाधव यांचा इशारा
⚡सावंतवाडी ता.२३-: ज्युस्तीन नगर येथून वारंग अवाट येथे जाणारा रस्ता नगरपालिकेचे नियम भंग करून बंद केल्याप्रकरणी न्याय मिळविण्यासाठी प्रजास्ताक दिनी उपोषण करण्याचा इशारा माजी नगरसेवक विलास जाधव यांनी निवेदनाद्वारे सावंतवाडी मुख्याधिकारी, सावंतवाडी पोलिस निरीक्षक, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी तहसीलदार, कोकण आयुक्त तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिला आहे.
याबाबत वारंवार माहिती देऊनही योग्य ती कार्यवाही करण्यात न आल्याने ज्युस्तीन नगर येथील रहिवासी आणि वारंग आवाट येथील रहिवासी यांना सोबत घेऊन उपोषण करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
