Headlines

परबवाडा शाळेचा शतक महोत्सव कार्यक्रम

⚡वेंगुर्ला ता.२३-: वेंगुर्ला येथील जिल्हापरिषद पूर्ण प्राथमिक शाळा परबवाडा नं.१ या शाळेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या शतकपूर्ती निमित्त २६ जानेवारी ते २८ जानेवारीपर्यंत शतक महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

  दि.२६ जानेवारी रजी सायंकाळी ६ वाजता शालेय शिक्षक मंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रविद्र चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, गटविकास अधिकारी मोहन भोई,  गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, शिक्षण विस्तार अधिकारी सुनिता भाकरे व उभादांडा केंद्रप्रमुख भागोनी अडूळकर यांच्या उपस्थितीत शतक महोत्सव, डिजिटल रुम व कॉम्प्युटर लॅबचे उद्घाटन, सत्कार सोहळा, विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, दि.२७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ग्रंथालयाचे उद्घाटन, वार्षिक बक्षिस वितरण, माजी विद्यार्थी व ग्रामस्थांचे सांस्कृतिक कार्यक्रम, श्दि.२८ जानेवारी रोजी सकाळी श्रीसत्यनारायण महापूजा, दुपारी आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ५ वाजता महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा‘ आणि रात्रौ ८ वाजता सातेरी तरुण दशावतार नाट्य मंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याध्यापक अनिता रॉड्रीग्ज आणि शालेय समिती अध्यक्ष संदिप परब यांनी केले आहे.
You cannot copy content of this page