वाफॉली येथे सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा

२६ ते २९ जानेवारी कालावधीत होणार सामने

बांदा/प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील वाफोली येथे “सरपंच चषक” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १५,५५५ रुपये व ५ फूट उंचीचा आकर्षक चषक तर द्वितीय पारितोषिक ११,१११ रुपये व आकर्षक चषक ठेवण्यात आला आहे. प्रवेश शुल्क १५०० रुपये व नोंदणी शुल्क १००० रुपये ठेवण्यात आले आहे.

इतर वैयक्तिक पारितोषिके मध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर अशी बक्षिसे देण्यात येणार आहे. सामने मर्यादित षटकांचे असून स्पर्धेमध्ये फेरबदल करण्याचे अधिकार मंडळाकडे राहतील.
गुरुवार दिनांक २६, शनिवार दिनांक २८ व रविवार दिनांक २९ रोजी सामने होणार आहेत. प्रवेश निश्चित करण्यासाठी प्रवेश शुल्कासह बंड्या परब (९११२७५८४०४), अनंत आईर (९४२३३०९८३९), बंटी आईर (७०६६१५५७०३), राजू आईर (७०६६८३४८४२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाफोली कुमार खण मैदान (आईरवाडी) मैदानावर सामने होणार आहेत.

You cannot copy content of this page