⚡सिंधुदुर्गनगरी ता.२३-: महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण* *विभाग शिक्षक मतदार संघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित मतदारसंघाच्या निवडणूकीच्या दिवशी सोमवार दि.३० जानेवारी २०२३ रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा मंजुर करण्यात आली आहे. अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिली.
अवर सचिव व उप मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्रान्वये सदरची रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजे व्यतीरिक्त असणार आहे.
