Headlines

Global Maharashtra Breaking News

विद्यार्थ्यांनी आई-वडील यांचे आदर्श समोर ठेऊन शिक्षण घ्यावे…

श्री. प्रितेश राऊळ ; वेंगुर्ला तालुका – शहरात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न.. ⚡वेंगुर्ला ता.१५-: वेंगुर्ला तालुक्यात तसेच शहरात जि. प. शाळा प्रवेशोत्सव 2026 उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्यासह नूतन लोकप्रतिनिधी, अधिकारी वर्ग यांनी सर्व प्रमुख शाळात उपस्थिती दर्शविल्यानेवेंगुर्ला तालुका शहरात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळीविद्यार्थ्यांनी आई-वडील…

Read Full News

मालवण तालुक्यातील मंडळे आंबा पीकविमा नुकसान भरपाईतून वगळली…

आंबा- काजू उत्पादक आक्रमक.. ⚡मालवण ता.१२-:यावर्षी हवामानातील तीव्र बदलांमुळे मालवण तालुक्यातील आंबा आणि काजू उत्पादनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. असे असतानाही विमा कंपन्यांनी तालुक्यातील अनेक प्रमुख मंडळांना नुकसान भरपाईतून वगळून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक सहकारी संघ मर्यादित यांच्या वतीने तहसीलदार गणेश लव्हे यांना निवेदन देण्यात…

Read Full News

भंडारी हायस्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात…

⚡मालवण ता.१५-:आजचे युग हे स्पर्धेचे युग असून या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच प्रशालेच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होत आपली प्रगती साधली पाहिजे, असे प्रतिपादन भंडारी एज्यूकेशन सोसायटी मालवण मुंबईचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर यांनी मोफत पाठ्यपुस्तक तसेच विध्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात बोलताना केले. मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे आज…

Read Full News

आंबोलीतील धोकादायक वृक्ष छाटणीला सुरुवात…

सरपंच सावित्री पालेकर यांच्या मागणीला यश:घाटातील दरड, तुटलेले संरक्षक कठडे व धोकादायक झाडांबाबत तातडीच्या उपाययोजनांची मागणी.. ⚡आंबोली, ता. १५-:आंबोली परिसरातील धोकादायक वृक्षांमुळे निर्माण झालेला अपघाताचा धोका लक्षात घेता आंबोलीच्या माजी सरपंच तथा प्रशासक सौ. सावित्री पालेकर यांनी केलेल्या मागणीला यश आले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंबोली गाव हद्दीतील धोकादायक…

Read Full News

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर होणार कारवाई .. .

सावंतवाडी शहरातील तीन ठिकाणी सीसीटीव्ही कार्यान्वित;नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या मागणीला यश.. ⚡सावंतवाडी ता.१५-: शहरातील ज्या सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो, अशा कचऱ्याच्या ‘हॉटस्पॉट’वर आता सावंतवाडी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवली जाणार आहे. उपनगराध्यक्ष तथा प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी ही महत्त्वपूर्ण मागणी मांडली…

Read Full News

पावसाळा लांबल्याने शाळा सकाळ सत्रात भरवा…

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची जि.प.च्या सीईओकडे मागणी.. ⚡कुडाळ ता.१५-: जिल्ह्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सर्व शाळा सकाळ सत्रात भरविण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की, यंदाच्या उन्हाळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात…

Read Full News

मोदींच्या नेतृत्वाखाली तुष्टीकरणाचा अंत, हिंदू अस्मितेचा उदय…

पालकमंत्री नितेश राणे:राष्ट्र प्रथम म्हणूनच मोदींच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत देश सर्वात सुरक्षित.. कणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभूतपूर्व आणि यशस्वी कारकिर्दीला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या निर्णय आणि परिवर्तनाचा लेखाजोखा मांडला. २०१४ पूर्वी देशात असलेल्या असुरक्षिततेच्या वातावरणातून मोदींनी देशाला…

Read Full News

भाजपा जनसंपर्क कार्यालयात ॲड. अनील निरवडेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

विशाल परब यांच्यासह मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव.. ⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनील निरवडेकर यांचा वाढदिवस आज भाजपा जनसंपर्क कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब यांच्या हस्ते केक कापून तसेच पुष्पगुच्छ व शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा भेट देऊन ॲड. निरवडेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व…

Read Full News

एक कोटींच्या ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’ प्रकल्पाचे भूमिपूजन…

⚡कणकवली ता.१५-: कणकवली शहरातील सुतारवाडी-निमेवाडी परिसरात साकारण्यात येणाऱ्या सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी बोलताना नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले की, कणकवली शहरात विविध विकासकामे प्रस्तावित असून त्याचाच एक भाग म्हणून आधुनिक सुविधांनी सुसज्ज उद्याने उभारली जात…

Read Full News

प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत करंजे येथे आदिवासी बांधवांच्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा संपन्न…

⚡सिंधुदुर्गनगरी,ता.१५-: प्रधानमंत्री जन मन आवास योजनेअंतर्गत करंजे ग्रामपंचायत क्षेत्रातील आदिवासी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी लाभार्थ्यांना नव्याने बांधण्यात आलेल्या घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री श्री. राणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून गरजू…

Read Full News

You cannot copy content of this page