मठ वनपाल सावळा कांबळे यांना ‘रजत पदक‘
⚡वेंगुर्ला ता.१५-: वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धनाचे काम प्रभावीपणे करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचे मनोधैर्य वाढविण्याकरीता व त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रोत्साहीत करण्याकरीता वेंगुर्ला तालुक्यातील मठ वनपाल सावळा सखाराम कांबळे यांना ‘रजत पदक‘ जाहीर झाले आहे. लवकरच मुंबई येथे मुख्यमंत्री व वनमंत्री यांच्या उपस्थितीत होणा-या विशेष कार्यक्रमात श्री. कांबळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
