Headlines

Global Maharashtra Breaking News

करूळ गावात ग्रामस्थ व शाळकरी मुलांकडून स्वच्छता मोहीम

ग्रा.पं.ने घेतला पुढाकार: तहसीलदार आर.जे. पवार यांची उपस्थिती ⚡कणकवली ता.०३-: कणकवली तालुक्यातील करूळ येथे ग्रामपंचायतच्या पुढाकाराने गावातील कर्मचारी, ग्रामस्थ आणि शाळकरी मुलांनी स्वच्छता मोहीम राबवली. कणकवलीचे तहसीलदार आरजे पवार यांनी या मोहिमेत सहभागी होत ग्रामपंचायत सरपंच समृद्धी नर व गावातील ग्रामस्थांना प्रेरणा दिली.सरपंच समृद्धी नर यांनी या स्वच्छता मोहिमेसाठी पुढाकार घेतला. उपसरपंच पुरुषोत्तम तानावडे ग्रामसेविका…

Read More

संत रोहिदास सेवाभावी संस्थेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

५ मार्च रोजी कणकवली येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा ⚡कणकवली ता.०३-: महाराष्ट्रातील रोहिदास समाजातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, साहित्य या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वेक्तिना संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय संत रोहिदासरत्न पुरस्कार देऊन संस्थेच्या वर्धापन दिनी गौरविण्यात येते.यावर्षी हे पुरस्कार पुढील व्यक्तीना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय…

Read More

चोरगेवाडी हिंदेवाडी हिर्लोक रस्त्यासाठी डीगस ग्रामस्थांचे उपोषण

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची मध्यस्थी;जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता आवटी यांनी दिले आश्वासन सिंधुदुर्गनगरी ता ०३डीगस घाण्याची वाडी येथील सुस्थितीत असलेल्या मोरीची उंची न वाढवता त्या ऐवजी डीगस चोरगेवाडी- हिंदेवाडी- हिर्लोक रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करावे. या मागणीसाठी डीगस ग्रामस्थांनी आज जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण केले. कुडाळ तालुक्यातील डीगस- चोरगेवाडी- हिंदे वाडी- हिर्लोक हा इतर…

Read More

काजू दर दोन रुपये चढ्या दराने खरेदी करणार

शेतकरी बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांची माहिती बांदा, दि. 3 (प्रतिनिधी)शासनाच्या उदासीतेचा फटका काजू बागायतदार शेतकऱ्यांना प्रामुख्याने बसत आहे. कारखानदार व शेतकरी यांच्यात सरळ व्यवहार होऊन शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे जास्त मिळणे आवश्यक असताना कारखानदारच व्यापाऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मोठे करीत आहेत. त्यामुळे उत्पादनाच्या दीडपट हमीभाव हे पंतप्रधानांचे वचन हवेतच विरले आहे. एकंदरीत कारखानदार व…

Read More

बांदा केंद्रशाळेत मुलींसाठी स्वतंत्र शौचालय

सुधीर शिरसाट यांनी केला कामाचा शुभारंभ बांदा/प्रतिनिधीबांदा केंद्रशाळेत १५ व्या वित्त आयोग निधीतून मुलींसाठी स्वतंत्र शौचालय बांधकाम कामाचा शुभारंभ सुधीर शिरसाट यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.या कामासाठी १ लाख ५० हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. बांदा केंद्रशाळेची पटसंख्या ही जिल्ह्यात सर्वाधिक असून त्यात विद्यार्थिनींची संख्या ही अधिक आहे. यासाठी शाळेत मुलींसाठी स्वतंत्र…

Read More

मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर मोती तलाव कठड्याचे काम इंजिनीअरच्या देखरेखीखाली सुरू

सावंतवाडीसावंतवाडी येथील कोसळलेल्या संस्थांनकालीन मोती तलावाच्या संरक्षक कठड्याच्या कामाचे काँक्रिटीकरणं सुरु असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांनी कामाच्या ठिकाणी दाखल होत हे काम काल सकाळी बंद पाडले. ईशारा देऊन देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एकही इंजिनियर या ठिकाणी ठेवण्यात न आल्याने मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. अखेरीस उपकार्यकारी अभियंता सगरे यांना संपर्क केला असता त्या ठिकाणी…

Read More

उभादांडा गणपतीचे विसर्जन ५ मार्च रोजी

⚡वेंगुर्ला ता.०३-: उभादांडा येथील गणपती मंदिरात स्थानापन्न झालेल्या श्री गणपतीचे विसर्जन रविवार दि.५ मार्च रोजी सायंकाळी ढोलताशे व भजनाच्या गजरात सागरेश्वर किनारी होणार आहे. तत्पूर्वी शनिवार दि.४ मार्च रोजी महाप्रसाद (म्हामणे) होणार आहे. भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे.

Read More

समुहगीतमध्ये वेताळ विद्यामंदिर जिल्ह्यात प्रथम

⚡वेंगुर्ला ता.०३-: बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवामध्ये जिल्हास्तरीय समुहगीत गायन लहान गट स्पर्धेत श्री वेताळ विद्यामंदिर तुळस शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले कविवर्य सुरेश भट लिखित ‘गे मायभू तूझे मी‘ या गीताने प्रथम क्रमांक मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे.जिल्हा परिषद आयोजित महोत्सव २०२२-२०२३ मध्ये या गीताने केंद्रस्तर, प्रभागस्तर, तालुका स्तरावर अव्वल स्थान प्राप्त…

Read More

केशवसुत स्मारकाचा अवमान करणाऱ्या व्हिडिओची सायबर क्राईम करणार चौकशी

संबंधितांवर होणार कारवाई ; ‘कोमसाप’ पदाधिकाऱ्यांना पोलिस निरीक्षकांच आश्वासन ⚡सावंतवाडी ता.०३-: सोशल मिडियावर झळकण्यासाठी मोती तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या कविवर्य केशवसुत यांच्या ‘तुतारी’ स्मारकाच्या ठिकाणी अवमानकारक वर्तन करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यातून कविवर्य केशवसुतांच्या स्मारकाचा अवमान झाला असून हा प्रकार साहित्यिकांसह सावंतवाडीकरांच्या भावनांना ठेच पोहचवणारा आहे. या घटनेचा कोकण…

Read More

फेरीवाल्यांचा विचार करून आठवडा बाजाराचा निर्णय घ्यावा

अँड.संदीप निंबाळकर;प्रशासनाला मोर्चा काढत दिले निवेदन ⚡सावंतवाडी ता.०३-: आठवडा बाजाराची जागा आजपर्यंत नगरपालिका प्रशासनाने फेरीवाल्यांना विचारात न घेता बदललेली आहे. .इथला आठवडा बाजार हा ग्राहकांना सोयीचा आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असून एसटी स्टँड देखील जवळ आहे. त्यामुळे इथल्या आठवडा बाजाराला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे जर आठवड्या बाजाराची जागा बदलून गैरसोयीची, वाहतुकीची अडचण, जिथे ग्राहक येत नाहीत…

Read More
You cannot copy content of this page