मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर मोती तलाव कठड्याचे काम इंजिनीअरच्या देखरेखीखाली सुरू

सावंतवाडी
सावंतवाडी येथील कोसळलेल्या संस्थांनकालीन मोती तलावाच्या संरक्षक कठड्याच्या कामाचे काँक्रिटीकरणं सुरु असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांनी कामाच्या ठिकाणी दाखल होत हे काम काल सकाळी बंद पाडले. ईशारा देऊन देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एकही इंजिनियर या ठिकाणी ठेवण्यात न आल्याने मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. अखेरीस उपकार्यकारी अभियंता सगरे यांना संपर्क केला असता त्या ठिकाणी तातडीने इंजिनियर पाठवून दिले त्यानंतर त्यांच्या देखरेखेखाली कामास सुरुवात करण्यात आली.
सावंतवाडी संस्थानकालीन मोती तलावात गाळ उपसा मोहीम सुरु असताना तलावाचा संरक्षक कठडा कोसळून हानी झाली होती. याबाबत वारंवार कल्पना देऊन देखील तांत्रिक अडचणी मुळे कामास विलंब झाला त्यामुळे संरक्षक कठडा आणखीनच कोसळला वं राष्ट्रीय महामार्गचे ही नुकसान झाले. त्यानंतर या कामासाठी दीड कोटी रुपयांचा निधी शासनाकडून देण्यात आला आणि कामास सुरुवात करण्यात आली. हे काम सुरु असताना बांधकाम खात्याचा एक ही अधिकारी त्या ठिकाणी फिरकला नाही. भूमीपूजन करून कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली मात्र कंपनीकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची टीका मनसेने केली होती. त्याशिवाय कामाच्या ठिकाणी जबाबदार खात्याचा इंजिनियर नियुक्त करून त्याच्या देखरेखेखाली काम करावे अन्यथा हे काम बंद पाडू असा इशारा दिला होता. इशारा देऊन सुद्धा दुसऱ्या दिवशी कॉक्रिटीकरणाचे काम सुरु करीत असल्याच्या तक्रारी मनसे पदाधिकारी यांना प्राप्त झाल्या. मनसे पदाधिकारी आशिष सुभेदार राजू कासकर यांनी आपल्या सहकारी पदाधिकारी यांच्या समवेत कामाच्या ठिकाणी धाव घेतली असता त्या ठिकाणी सांर्वांजनिक बांधकाम विभागाचा एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले वं हे काम बंद पाडले. व कार्यकारी अभियंता यांचा संपर्क होत नसल्याने उपकार्यकरी अभियंता सागरे यांना संपर्क करत मनसे पदाधिकारी आक्रमक झाले त्यानुसार उपकार्यकारी अभियंता सगरे यांनी तातडीने येथे इजिनियरची नेमणूक केली त्यानंतर काम करण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी काम रेटण्यचा प्रयत्न कोणी करू नये चांगल्या दर्जाचे काम केले जावे असा इशारा माजी शहराध्यक्ष आशिष सुभेदार व राजू कासकर यांनी बांधकाम खात्याला दिला आहे. यावेळी माजी शहराध्यक्ष तथा मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर माजी तालुका उपाध्यक्ष अतुल केसरकर अजित सांगेलकर विभाग अध्यक्ष मंदार नाईक नंदू परब दर्शन सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page