बांदा केंद्रशाळेत मुलींसाठी स्वतंत्र शौचालय

सुधीर शिरसाट यांनी केला कामाचा शुभारंभ

बांदा/प्रतिनिधी
बांदा केंद्रशाळेत १५ व्या वित्त आयोग निधीतून मुलींसाठी स्वतंत्र शौचालय बांधकाम कामाचा शुभारंभ सुधीर शिरसाट यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
या कामासाठी १ लाख ५० हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. बांदा केंद्रशाळेची पटसंख्या ही जिल्ह्यात सर्वाधिक असून त्यात विद्यार्थिनींची संख्या ही अधिक आहे. यासाठी शाळेत मुलींसाठी स्वतंत्र शौचालय होण्याची मागणी पालक व ग्रामस्थतून होत होती.
यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, साईप्रसाद काणेकर, तनुजा वराडकर, देवल येडवे, शिक्षिका सरोज नाईक, वंदना शितोळे, जे डी पाटील, ठेकेदार तुषार परब आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page