केशवसुत स्मारकाचा अवमान करणाऱ्या व्हिडिओची सायबर क्राईम करणार चौकशी

संबंधितांवर होणार कारवाई ; ‘कोमसाप’ पदाधिकाऱ्यांना पोलिस निरीक्षकांच आश्वासन

⚡सावंतवाडी ता.०३-: सोशल मिडियावर झळकण्यासाठी मोती तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या कविवर्य केशवसुत यांच्या ‘तुतारी’ स्मारकाच्या ठिकाणी अवमानकारक वर्तन करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यातून कविवर्य केशवसुतांच्या स्मारकाचा अवमान झाला असून हा प्रकार साहित्यिकांसह सावंतवाडीकरांच्या भावनांना ठेच पोहचवणारा आहे. या घटनेचा कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडीच्यावतीनं तीव्र निषेध करत संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी व भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत याची दक्षता घ्यावी, अशी मागणी कोमसाप शाखा सावंतवाडीच्यावतीनं पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शिक्षकी पेक्षा असणाऱ्या कविवर्य केशवसुत उर्फ कृष्णाजी केशव दामले यांच सावंतवाडी शहरात माठेवाडा येथे वास्तव्य होत. यावेळी मोती तलाव काठावर संध्याकाळ या कवितेच लेखन त्यांनी केलं होतं. त्यांच्या स्मरणार्थ मोती तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या केशवसुत कट्ट्यावर त्यांच्या काही अजरामर कविता पहायला मिळतात. त्यांच्या तुतारी कवितेच प्रतिक असणारं तुतारी स्मारक या ठिकाणी उभारण्यात आले आहे. दरम्यान, गेले दोन दिवस एका अज्ञात व्यक्तीचा स्मारकाच्या ठिकाणी असणारी तुतारी फुंकतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो व्यक्ती स्मारकावर उभा राहून तुतारी फुंकण्याचा अभिनय करत आहे. हा व्हिडिओ एडिट करून त्याला तुतारीचा आवाज लावून सोशल मिडियावर टाकला गेला. ट्रेडिंगच्या नावाखाली स्मारकाचा अवमान त्या व्यक्तीकडून केला गेला आहे. या घटनेचा कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडीच्यावतीन तीव्र निषेध करत संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी व भविष्यात अशा घटना होऊ नये याची दक्षता घ्यावी, अशी मागणी कोमसाप शाखा सावंतवाडीच्यावतीनं पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, न.प.मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

ही घटना निषेधार्ह आहे. याबाबत पोलिसांना न.प. तर्फे कारवाईची विनंती करणार असून स्मारकाच्या ठिकाणी यापुढे अशा घटना घडू नये यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सुचना फलक लावण्यात येणार असल्याचं मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी सांगितले. तर पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित व्यक्ती व व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्यांचा सायबर क्राईमच्या माध्यमातून शोध घेऊन कारवाई करणार, व्हायरल व्हिडिओ व कोमसापनं केलेली मागणी सायबर क्राईमच्या अधिकाऱ्यांकडे वर्ग करत संबंधितांवर कडक कारवाई करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, सोशल मिडिया ट्रेडिंगच्या नावाखाली अशा प्रकारचा घटना पुन्हा घडू नये, तुतारीला बाधा निर्माण होईल असं कृत्य कुणाकडून घडू नये यासाठी दक्षता घ्यावी असं आवाहन कोमसाप सावंतवाडी शाखेच्या माध्यमातून करण्यात आल आहे. याप्रसंगी कोमसाप शाखा सावंतवाडी अध्यक्ष अँड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, जिल्हा सदस्य भरत गावडे, अँड. नकुल पार्सेकर, दीपक पटेकर, प्रा. रूपेश पाटील, विनायक गांवस आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page