संत रोहिदास सेवाभावी संस्थेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

५ मार्च रोजी कणकवली येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा

⚡कणकवली ता.०३-: महाराष्ट्रातील रोहिदास समाजातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, साहित्य या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वेक्तिना संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय संत रोहिदासरत्न पुरस्कार देऊन संस्थेच्या वर्धापन दिनी गौरविण्यात येते.यावर्षी हे पुरस्कार पुढील व्यक्तीना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याप्रित्यर्थ प्रभात दत्तकुमार फोंडेकर यांना संत रोहिदास शिक्षणरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रभात फोंडेकर यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विद्यापीठ, रांची मधून रॉकेट प्रोपलशन एमटेक ही पदव्युत्तर पदवी संपादन केली तसेच पी. एच. डी. ही पदव्युत्तर पदवी देखील धारण केली असून सध्या मार्स एक्सप्लोरेशन कंपनी मध्ये सहायक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन कै. श्री. नारायण शंकर मसुरकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार संस्थेचे संस्थापक राज्यसचिव प्रसाद मसुरकर यांनी पुरस्कृत केला आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील दुसरा पुरस्कार होडावडे गावाचे सुपुत्र स्वप्निल अरुण होडावडेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. स्वप्निल यांनी २०१९ मध्ये एम. पी. एस. सी. मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले असून हल्लीच जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता गट – ब ( राजपत्रित) म्हणून कार्यरत आहेत. स्वप्निल होडावडेकर यांच्या याच कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार कै. श्रीमती चंद्रभागा दिगंबर फोंडेकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष दत्तकुमार दिगंबर फोंडेकर यांनी पुरस्कृत केला आहे.
सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ रजनी मुरलीधर शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. सौ.शिंदे यांनी गेल्या १५ वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात महिला सक्षमीकरणाचे काम करत आहेत. तसेच १५०० पेक्षा जास्त गरीब महिलांना रोजगार देऊन त्यांना आर्थिक सक्षम बनविले आहे. अनेक संस्थांचे त्या पदाधिकारी आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन कै. सौ. सरोज सुभाष कदम यांच्या स्मरणार्थ संत रोहिदास समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार संस्थेचे संस्थापक राज्याध्यक्ष संजय कदम यांनी पुरस्कृत केला आहे.
वरवडे कणकवली येथील रहिवाशी तसेच उदयोन्मुख कवी, लेखिका सौ. सरीता सदाशिव पवार यांना साहित्य क्षेत्रातील राज्यस्तरीय रोहिदास साहित्यरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सौ. सरीता पवार यांनी गेल्या वीस वर्षांपासून विविध क्षेत्रातील ज्वलंत प्रश्न घेऊन त्यावर लेखन, कविता, ललितलेख, स्फुटलेखन केले असून अनेक कवितासंग्रह, कथा, कादंबऱ्या लिहिल्या असून प्रकाशित केल्या आहेत. त्यांनी विविध साहित्यलेखन केले असून सिंधुदुर्ग जिल्हा कवीसंमेलनचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन कै. श्री. सहदेव जयदेव बांबार्डेकर यांच्या स्मरणार्थ संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष डॉ प्रदिप सहदेव बांबार्डेकर यांनी हा पुरस्कार पुरस्कृत केला आहे.
नवी मुंबई चेंबूर येथील उद्योगपती असलेले संजय दत्ताराम चव्हाण यांना सहकार क्षेत्रातील राज्यस्तरीय संत रोहिदास सहकाररत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संजय चव्हाण हे मूळ कणकवली येथील असून उद्योगानिम्मित गेली ५० वर्ष मुंबई येथे स्थायिक असून ओमकार बर्ड प्रूफिंग इंडिया प्रा. लि. या कंपनीची स्थापना करून ग्राहकांना अतिउत्तम सेवा देऊन अल्पावधीतच आपले नाव राज्यात पोचविले आहे. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत ४०० तरुणांना रोजगार दिला आहे. तसेच गरीब, होतकरू, अनाथ मुले यांना शैक्षणिक साहित्य वाटप दरवर्षी करत असून कणकवली तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील ते नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हा सल्लागार आणि माजी विस्तार अधिकारी, कुडाळ श्री. रमेश गोपाळ कसालकर यांनी पुरस्कृत केला आहे.
ओरोस येथील रहिवासी असलेले आणि इंजिनिअरिंगची पदवी घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करुन रोहिदास समाजाचे नाव कोकण विभागात पोचविनारे युवा व्यावसायिक तुषार विष्णू चव्हाण यांना राज्यस्तरीय संत रोहिदास सहकाररत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार कै. श्रीमती. सीताबाई रामचंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ संस्थेचे संस्थापक राज्य उपाध्यक्ष पंढरी रामचंद्र जाधव यांनी पुरस्कृत केला आहे.
आपल्या अभिनयाने नाट्य रसिकांवर भुरळ घालणारे आणि कोकणातील दशावतार परंपरा जपणारे तेंडोली गावचे सुपुत्र प्रशांत गोपाळ तेंडोलकर यांना राज्यस्तरीय संत रोहिदास सांस्कृतिकरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार कै. श्री. गणपत गोपाळ पावसकर यांच्या स्मरणार्थ संस्थेचे संस्थापक राज्यखजिनदार आणि माजी आरोग्य विस्तार अधिकारी रविंद्र गणपत पावसकर यांनी पुरस्कृत केला आहे.
सात पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ४५ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यांचे चिकित्सक परीक्षण करून अंतिम सात जणांची निवड पुरस्कार निवड समितीप्रमुख प्रसाद मसुरकर सर, दत्तकुमार फोंडेकर , डॉ. प्रदिप बांबार्डेकर, श्री सुभाष कसालकर यांनी केले आहे.
वरील सर्व पुरस्कार प्राप्त वेक्तीना ५ मार्च रोजी मराठा मंडळ सभागृह कणकवली येथे संस्थेच्या राज्यस्तरीय चतुर्थ वर्धापन दिनी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page