Headlines

Global Maharashtra Breaking News

अपघाताचे निमंत्रण ठरणारा खड्डा तातडीने बुजवा…

निलेश दुधवडकर:नगरपालिका प्रशासनाकडे केली मागणी.. ⚡मालवण ता.०७-: मालवण शहरातील टोपीवाला हायस्कूल मार्गावर रस्ता खचून मोठा खड्डा पडला आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असून शाळांमध्ये जाणारी मुलेही या रस्त्याने प्रवास करतात. त्यामुळे अपघाताचे निमंत्रण ठरणारा हा खड्डा तातडीने बुजवण्याबाबत उपाययोजना करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश दुधवडकर व नागरिकांनी मालवण नगरपालिका प्रशासनाकडे केली. टोपीवाला हायस्कुल मार्गावरील…

Read More

पालकमंत्री रविंद्र चव्हाण १० जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे सोमवार दि. 10 जुलै 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दि. 10 जुलै 2023 रोजी दुपारी 3.05वा. मनोहर (मोपा) विमानतळ, गोवा येथे आगमन व ओरोस, जि.सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी 4 वा….

Read More

आमदार नितेश राणे यांनी मागणी केलेली रस्ते विकासाची कामे मंजूर

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आठ रस्त्यांसाठी १८ कोटी ३२ लाख रुपये;ग्रामविकास विभागामार्फत प्रशासकीय मान्यता.. ⚡देवगड ता.०७-: मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (संशोधन व विकास) अंतर्गत भाजप नेते आम.नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार कणकवली, देवगड,वैभववाडी या तालुक्यांमध्ये १८ कोटी ३२ लाख रुपयांची रस्ते विकासाची कामे मंजूर झाली आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्यांच्या दर्जोन्नतीच्या कामांना ग्रामविकास विभागामार्फत ५ जुलै २०२३ रोजी प्रशासकीय मान्यता…

Read More

बांदा शहरात मतदार यादीचे सर्वेक्षण करून बोगस मतदारांची नावे काढून टाका…

बाबा काणेकर: भाजप जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली दिले तहसीलदारांना निवेदन.. ⚡बांदा ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांगलादेशी मुस्लिम मतदार सापडल्याने या पार्श्वभूमीवर बांदा शहरात मतदार यादीचे सर्वेक्षण करून बोगस मतदारांची नावे यादीतून काढून टाकावी अशा मागणीचे निवेदन भाजपचे बांदा शहर अध्यक्ष नरसिंह उर्फ बाबा काणेकर यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तहसीलदार श्रीकांत पाटील यांना आज दिले….

Read More

राष्ट्रवादी पक्ष आम्ही कोणीही सोडलेला नाही …

काका कुडाळकर:कालची हकालपट्टी ही हास्यास्पद ⚡कुडाळ ता.०७-: आम्ही कोणीही राष्ट्रवादी सोडलेली नाही. आम्ही राष्ट्रवादीतच राहणार; कालची हकालपट्टी ही हास्यास्पद गोष्ट आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक हेमंत उर्फ काका कुडाळकर यांनी आज कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी काका कुडाळकर म्हणाले की, शरद पवार हे आमच्यासाठी आदरणीयच राहतील. पक्षाची धुरा अजित पवार…

Read More

बांदा केंद्र शाळेच्या पूर्वा मौर्ये व दिव्या तरटेची नवोदय विद्यालयासाठी निवड

⚡बांदा ता.०७-: जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्रशाळेतील विद्यार्थिनीं कुमारी पूर्वा हेमंत मोर्ये व दिव्या मारुती तरटे दोन विद्यार्थीनींची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असून शाळेचे विद्यार्थी नवोदयला विद्यालयाला निवड होण्याची परंपरा कायम राहिली आहे. चालू वर्षी २९ एप्रिलला जवाहर नवोदय विद्यालयासाठी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांची निवड करणेसाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत राबविल्या जात…

Read More

कणकवलीत मुसळधार पावसामुळे नुकसान सुरूच

फोंडाघाट , आयनल व तळवडे येथे झाले नुकसान ⚡कणकवली ता.०७-: गेल्या दोन दिवसापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली तालुक्यात घरावर झाड पडून नुकसान होण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे फोंडाघाट (विद्यानगर)येथील अनंत बाबाजी यादव यांच्या राहत्या घराची भिंत पावसामुळे कोसळून अंदाजे 15000/-रुपयांचे नुकसान झालेले आहे. आयनल येथे संध्याकाळी दिगंबर रामा वायगणकर यांचे…

Read More

फोंडाघाट शाखेमार्फत ४० रिक्षा व्यावसायिक व २५ इतर व्यावसायिकांना क्युआर कोडचे वाटप

⚡कणकवली ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग बँकेच्या ४० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून फोंडाघाट शाखेमार्फत ४० रिक्षा व्यावसायिक व २५ इतर व्यावसायिकांना क्युआर कोडचे वाटप बँकेचे संचालक विठ्ठल देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमावेळी शाखा व्यवस्थापक आर. बी. गांवकर, विकास अधिकारी पी.वाय. कुलकर्णी, सबअकौंटंट जयंत जाधव, शिपाई महेंद्र रासम, लिपिक अमेय आर्डेकर,…

Read More

कणकवलीत युपीएससी , एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरु करणार

संदेश सावंत;जिजाऊ फाऊंडेशन , युवा प्रतिष्ठानतर्फे मोफत वह्यावाटप ⚡कणकवली ता.०७-: जिजाऊ फाऊंडेशन आणि युवा संदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिंधुदुर्गात २ लाख वह्या वाटप प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना केले जात आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतुन हा उपक्रम राबवला जातो. विद्यार्थ्यांनी चिकाटी बाळगण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षक , पालक आणि सर्वंच राजकारण्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. येत्या २ महिन्यांत कणकवलीत युपीएससी…

Read More

पावसाच्या पाण्याने कुडाळ बनले समस्याग्रस्त

नागरिक त्रस्त:जागोजागी साचले आहे पाणी कुडाळ ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजा आनंदीत झाला आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे कुडाळ शहराची झालेली स्थिती दयनीय आहे. कुडाळ शहरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे. कुडाळ नगरपंचायतने काही महिन्यांपूर्वीच नालेसफाई केल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, कुडाळ शहरातील काळप…

Read More
You cannot copy content of this page