पालकमंत्री रविंद्र चव्हाण १० जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे सोमवार दि. 10 जुलै 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार दि. 10 जुलै 2023 रोजी दुपारी 3.05वा. मनोहर (मोपा) विमानतळ, गोवा येथे आगमन व ओरोस, जि.सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी 4 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस जि. सिंधुदुर्ग येथे आगमन जिल्हा नियोजन समिती बैठकीस उपस्थिती. स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस. सायं. 5 वा. डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत बैठक. स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस. सायं. 5.15 वा. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पंतप्रधान ग्रामसडक योजना अंतर्गत कामांचा आढावा. स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस. सायं. 5.30 वा. जिल्हा क्रीडा संकूल समिती बैठक. स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस.सायं. 5.45 वा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिम जमाती कातकरी यांच्या करिता विविध योजना राबविण्याबाबत आढावा बैठक. स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस. सायं.6 वा. जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे राखीव. सायं.7 वा. ओरोस जि. सिंधुदुर्ग येथून गोवाकडे प्रयाण.रात्री 8.30 वा. मनोहर (मोपा) आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे आगमन व राखीव.
००००

You cannot copy content of this page