निलेश दुधवडकर:नगरपालिका प्रशासनाकडे केली मागणी..
⚡मालवण ता.०७-: मालवण शहरातील टोपीवाला हायस्कूल मार्गावर रस्ता खचून मोठा खड्डा पडला आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असून शाळांमध्ये जाणारी मुलेही या रस्त्याने प्रवास करतात. त्यामुळे अपघाताचे निमंत्रण ठरणारा हा खड्डा तातडीने बुजवण्याबाबत उपाययोजना करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश दुधवडकर व नागरिकांनी मालवण नगरपालिका प्रशासनाकडे केली.
टोपीवाला हायस्कुल मार्गावरील तो खड्डा चुकविण्याचा प्रयत्न वाहन चालक करतात. या प्रयत्नात मार्गावरून ये – जा करणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघात घडू शकतो. तरी तो खड्डा तात्काळ बुजवावा अशी मागणी नगर पालिका आवेक्षक सुधाकर पाटकर यांना दिलेल्या निवेदन माध्यमातून करण्यात आली. यावेळी मोहन वराडकर, विलास मुणगेकर, रमण वाईरकर, हर्षल मालंडकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, गुरुवारी जोरदार वाऱ्यामुळे दांडी मोरेश्वर वाडी येथील स्मशानभूमीच्या निवारा शेडचे छप्पर उडून गेलेले आहे. कोसळलेले छप्पर स्मशानभूमीच्या प्रवेश मार्गावरुन बाजूला करत याठिकाणी दुरुस्ती व उपाययोजना कराव्यात अशीही मागणीही निवेदनाच्या माध्यमातून निलेश दुधवडकर यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.
