फोंडाघाट , आयनल व तळवडे येथे झाले नुकसान
⚡कणकवली ता.०७-: गेल्या दोन दिवसापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली तालुक्यात घरावर झाड पडून नुकसान होण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे
फोंडाघाट (विद्यानगर)येथील अनंत बाबाजी यादव यांच्या राहत्या घराची भिंत पावसामुळे कोसळून अंदाजे 15000/-रुपयांचे नुकसान झालेले आहे. आयनल येथे संध्याकाळी दिगंबर रामा वायगणकर यांचे घराचे पत्रे जोराच्या वारा व पाऊस यामुळे मोडल्याने अंदाजे रू 15000/- नुकसान झाले आहे . तळवडे येथे सुरेश झिलू राऊळ यांच्या घरा वर झाड पडून यांचे कौले कोनवासा व इतर वासे मोडले भिंत कोसळली आहे अंदाजे रू 10000/- नुकसान झाले आहे .
