फोंडाघाट शाखेमार्फत ४० रिक्षा व्यावसायिक व २५ इतर व्यावसायिकांना क्युआर कोडचे वाटप

⚡कणकवली ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग बँकेच्या ४० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून फोंडाघाट शाखेमार्फत ४० रिक्षा व्यावसायिक व २५ इतर व्यावसायिकांना क्युआर कोडचे वाटप बँकेचे संचालक विठ्ठल देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी शाखा व्यवस्थापक आर. बी. गांवकर, विकास अधिकारी पी.वाय. कुलकर्णी, सबअकौंटंट जयंत जाधव, शिपाई महेंद्र रासम, लिपिक अमेय आर्डेकर, अवधूत सावंत, सौ. बालेघाटकर, सौ. सस्मिता सावंत, पिग्मी एजंट अशोक सावंत, सौ. श्यामल म्हाडगूत व बॅकेचे ग्राहक, हितचिंतक उपस्थित होते.

यावेळी संचालक विठ्ठल देसाई यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करुन बँकेकडून सर्व ग्राहकांना बॅकींग कामकाजामध्ये सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे सांगितले. जिल्हयामध्ये अशाप्रकारे एकाचवेळी रीक्षा व्यावसायिकांना एकत्र आणून त्यांना क्युआर कोडसारखी डिजीटल बॅकींगची सुविधा उपलब्ध करुन देणारी बँकेची फोंडाघाट ही जिल्हयातील पहीली शाखा आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल संचालक विठ्ठल देसाई यांनी शाखेतील अधिकारी/कर्मचारी यांचे अभिनंदन केले. सदरवेळी उपस्थित ग्राहकांना शाखाव्यवस्थापक यांनी बँकेच्या डिजीटल सुविधेबाबत माहिती देण्यात आली.यावेळी फोंडाघाट शााखेच्या एकूण कामकाजाबाबत ग्राहकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

You cannot copy content of this page