Headlines

Global Maharashtra Breaking News

कोकणात मुसळधार पावसाचा फटका

कोकण रेल्वेची वाहतूक तीन ते साडेतीन तास उशिराने कणकवली : कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता कोकण रेल्वे वाहतुकीवरही दिसून येत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक गाड्या तीन ते साडेतीन तास उशिराने धावत असून रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये रविवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम…

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यातशिष्यवृत्ती परीक्षेत 26 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

वेंगुर्लामहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेतवेंगुर्ला तालुक्यातुन 26 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत. यामध्ये इयत्ता पाचवीमध्ये एकूण 11 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक व इयत्ता आठवी मध्ये एकूण 15 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत. राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीमध्ये (8 वि )अथर्व चालोबा हरगुडे ( गुरुवर्य अ. वि. बावडेकर विद्यालय शिरोडा, 81 टक्के) याने…

Read Full News

राम मंदिर घोटाळ्याचा मारुती मंदिरात महाआरती करून निषेध

कुडाळ तालुका महाविकास आघाडीतर्फे आयोजन कुडाळ : अयोध्या येथील राम मंदिराच्या दानपेटीतील घोटाळ्याच्या निषेधार्थ कुडाळ तालुका महाविकास आघाडीने रविवारी सायंकाळी कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात महाआरती केली.यावेळी माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक, तालुकाप्रमुख राजन नाईक, शहरप्रमुख संतोष शिरसाट, जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर, बाळा पावसकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, उल्हास शिरसाट मंदार चंद्रकांत शिरसाट,…

Read Full News

श्री देव कुडाळेश्वर मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण

कार्यक्रमात सर्व स्तरातील नागरिकांनी घेतला सहभाग कुडाळ : शहरातील श्री देव कुडाळेश्वर मंदिराच्या परिसरात श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये भाविक,लोकप्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये विविध प्रकारच्या वृक्षांची परिसरात लागवड करण्यात आली. हि झाडे जागवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळाच्या वतीने हा सामाजिक उपक्रम…

Read Full News

मालवण आणि कुंभारमाठ गावचे पोलीस पाटील विठ्ठल बावकर यांचे अकाली निधन

मालवण ता.०५-: मालवण आणि कुंभारमाठ गावचे पोलीस पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल तथा बबन एकनाथ बावकर वय ५६ यांचे आज रविवारी दुपारी साडे बारा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. श्री. बावकर यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मालवण तालुक्यातील कुंभारमाठ गावचे रहिवासी विठ्ठल एकनाथ बावकर हे गेली पंधरा वर्षे कुंभारमाठ गावचे पोलीस…

Read Full News

देवगडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध…

पालकमंत्री नितेश राणे:निधीची कमतरता भासू देणार नाही;देवगड येथील पर्यटन केंद्राचे भूमिपूजन संपन्न.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.०५-: देवगड शहराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास करण्यासाठी पालकमंत्री म्हणून कटिबद्ध असून, विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. देवगड-जामसंडे शहराला आदर्श शहर म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने भव्य नाट्यगृह, आधुनिक पर्यटन केंद्र, पर्यावरणपूरक पर्यटन प्रकल्प तसेच पंचतारांकित हॉटेल उभारणीसाठी शासन प्रयत्नशील असल्याचे…

Read Full News

कर्मचाऱ्यांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर पालकमंत्र्यांची ठाम भूमिका

कर्मचारी संघटनांनी आंदोलन स्थगित करण्याचा घेतला निर्णय कणकवली : देवगड येथे बीएलओ प्रशिक्षणादरम्यान कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी कर्मचाऱ्यांबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. कर्मचाऱ्यांच्या सन्मानाच्या प्रश्नावर पालकमंत्री यांनी ठाम भूमिका घेत, संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचारी संघटनांनी आंदोलन…

Read Full News

मुक्ताई अकादमीच्या कॅरम-बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ : सावंतवाडी येथील मुक्ताई अकादमीच्या वतीने लहान मुलांसाठी आयोजित करण्यात कॅरम आणि बुद्धिबळ खेळाच्या प्रशिक्षण शिबिराला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुडाळ शहर आणि तालुक्यातून आलेल्या मुलांनी कॅरम आणि बुद्धिबळ खेळाचे प्राथमिक धडे गिरवले.कॅरम आणि बुद्धिबळ या खेळाची लहान मुलांना आवड निर्माण व्हावी यासाठी सावंतवाडी येथील मुक्ताई अकादमीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले…

Read Full News

ग्रामीण रुग्णालय परिसरात झाड पडून नुकसान

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी घेतली तात्काळ दखल कुडाळ : येथील ग्रामीण रुग्णालय परिसराच्या आवारातील नीर फणसाचे झाड आज सकाळी रुग्णालय परिसरातील एका इमारतीवर पडले. नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ दखल घेतली. नगर पंचायतचे कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल होत त्यांनी ते झाड तोडून बाजूला केले. या मध्ये इमारतीच्या वर असलेली पाण्याच्या…

Read Full News

मनसे दोडामार्ग तालुक्याची साप्ताहिक बैठक उत्साहात; उपसरपंच अमोल परब यांचा सत्कार

दोडामार्ग : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) दोडामार्ग तालुक्याची साप्ताहिक बैठक हॉटेल सोनचाफा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत ग्रुप ग्रामपंचायत आडाळी-फोंडयेच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र सैनिक अमोल परब यांचा तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. बैठकीत दोडामार्ग तालुक्यात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने विविध गावांमध्ये मनसेच्या…

Read Full News

You cannot copy content of this page