बंद स्ट्रीट लाईट,हायमास्ट सुरु करण्यासाठी ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा
मालवण नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिली पंधरा दिवसांची डेडलाईन ⚡मालवण ता.०८-: मालवण नगरपरिषद हद्दीतील मार्गावरील अनेक स्ट्रीट लाईट बंद स्थितीत आहेत. मुख्य चौक, नाक्यांवर बसविण्यात आलेले हायमास्ट टॉवरही बंद असून १५ दिवसात या लाईट सुरु न केल्यास नागरिकांसमवेत नगरपरिषद कार्यालया समोर आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालवण शहर तर्फे मालवण नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आला…
