नृत्यांगना मृणाल सावंत हीचा राष्ट्रवादी महिला विभागाकडून सत्कार…

कथक विशारद पदवी केली प्राप्त:
कोकण विभागीय नेत्या अर्चना घारे परब यांनी केला सन्मान

⚡कुडाळ.०२-: कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील नृत्यांगना मृणाल सावंत हीचा वेंगुर्ले येथे तिने मिळविलेल्या राज्य आंतरराज्य स्पर्धेसह कथक विशारद पदवी प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला हा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या उद्योजिका अर्चना घारे यांच्या हस्ते करण्यात आला.

वेंगुर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन कुडतरकर यांच्या वतीने वेंगुर्ला तालुक्यातील निमंत्रित कलाकारांसाठी “डान्सिंग सुपरस्टार” ही नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी हा सन्मान करण्यात आला अर्चना घारे यांनी या स्पर्धेचे उद्घाटन करून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या व उदयोन्मुख कलाकारांना भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा अभिनव उपक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष नम्रता कुबल, तालुका अध्यक्ष योगेश कुबल, शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, रयत शिक्षण संस्थेचे अँथोनी डिसोजा, तालुका उपाध्यक्ष विशाल बागायतदार, तालुका सचिव स्वप्नील रावळ, तालुका उपाध्यक्ष सलीम नाबर, वेंगुर्ला शहर कार्याध्यक्ष सुहास कोळसकर, बबन पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
वेंगुर्ले
येथे कथक विशारद पदवी प्राप्त नृत्यांगना मृणाल सावंत हीचा सन्मान करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या उद्योजिका अर्चना घारे नम्रता कुबल नितीन कुडतरकर आदी

You cannot copy content of this page