नवीन वर्षाच्या पहाटेच अवैध वाळू वाहतूकी विरोधात आचरा पोलीसांची धडक कारवाई…

तीन डंपर घेतले ताब्यात;गुन्हा दाखल..

मालवण दि प्रतिनिधी
कालावल खादीपट्ट्यात बेकायदेशीर वाळू वाहतूकी विरोधात पोलिसांनी एकीकडे कारवाई सुरू केली असतानाच पोलिसी कारवाईला न जुमानता वाळू माफियांनी बेकायदेशीर वाळू वाहतूक सुरूच ठेवल्याने प्रशासनाच्या करवाईवर प्रश्नचिन्ह उभे केले जात असतानाच आज सोमवारी आज सोमवारी आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी मालवण हद्दीतील तोंडवळी खाडीपट्ट्यात।कोंबिंग ऑपरेशन करत तोंडवळी खाडी पात्रातील अवैध वाळू काढून आचरा हद्दीतून विनापरवाना वाळू वाहतूक करत असताना खाजगी गाडीने पाठलाग करत तीन डंपरना ताब्यात घेतल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत

यासंबंधीचे।अधिक वृत्त असे की, अवैध वाळू व्यवसायाविरोधात नवीन वर्षातही पोलीसांची धडक कारवाई सुरु असून सोमवारी पहाटे आचरा पोलीसांनी वाळू वाहतूक करणाऱ्या तीन डंपर वर कारवाई करत गुन्हा दाखल करुन तपासासाठी मालवण पोलीस स्टेशनला पाठविण्यात आले आहेत. अवैध वाळू वाहतूकी विरोधात पोलीस कारवाई तीव्र झाली असली तरी कारवाईला न जुमानता काही वाळू व्यावसायिकांकडून पहाटेच्या सुमारास वाळू वाहतूक निर्धोक सुरु असल्याचे बोलले जात होते. आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी या बाबत कडक कारवाई सुरु केली आहे.

नविन वर्षाच्या सुरुवातीलाच आज सोमवारी भल्या पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कोंबींग ऑपरेशन करत मालवण पोलीस ठाणे हद्दीतील तोंडवळी खाडी पात्रातून अवैध वाळू काढून आचरा हद्दीतून विनापरवाना वाळू वाहतूक करत असताना खाजगी गाडीने पाठलाग करत तीन डंपरना ताब्यात घेतले. यात सचिन तुकाराम जंगले, (वय-30 वर्ष, रा – पिसे- कामते कणकवली )याच्या ताब्यातील डंपर ( क्रमांक MH- 07 AJ 111 ), अजय सदाशिव जाधव/( वय -40 वर्ष, रा – कणकवली शिवाजीनगर ) याच्या ताब्यातील डंपर ( क्रमांक MH-07-C-6373 ) तसेच
मंजुनाथ चन्नप्पा चव्हाण ( वय -24 वर्ष रा -कणकवली बँक कॉलनी मुळ राहणार – कक्कळ मेली ता- सिंदगी जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक ) याच्या ताब्यातील ( क्रमांक MH-07- AJ-9991) यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर वाळू चोरी मालवण हद्दीतील असून आचरा पोलिस ठाणे येथे तीन वाळू चोरीचे गुन्हे दाखल करून तपास करीता मालवण पोलिस ठाणे येथे पाठविण्यात आले असल्याचे आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी सांगितले ‌

सदर कारवाई पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकार आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी केली. या कारवाईत आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी महेश देसाई, मिलिंद परब आदी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page