हिट ॲन्ड रन’ कायद्याबाबत संजय राऊत यांना टीका करण्याचा अधिकार नाही…

आम.नितेश राणे:लोकांचा जीव वाचवणे हे शासनाचे प्रथम कर्तव्य..

⚡कणकवली ता.०२-: ‘हिट ॲन्ड रन’ कायद्यामध्ये काही बदल केल्यामुळे त्या कायद्याच्या संदर्भात काही लोकांचे आक्षेप असू शकतात. त्याबद्दल आमचे केंद्र सरकार विचारही करेल. फक्त २०२२ मधले आकडे बघितले तर ४७ हजार लोकानी या हिट ॲन्ड रन मुळे आपला जीव गमावलेला आहे. या सगळ्याबद्दल केंद्रसरकार म्हणून त्या दिशेने काही होत असेल तर त्यामुळे संजय राऊत सारख्या लोकांना सरकारवर टिका करण्याचे काही कारण नाही. शेवटी लोकांचा जीव वाचवणे ही आमच्या केंद्रसरकारची प्राथमिकता आहे. त्याबद्दल आमचे केद्रसरकार निश्चित पध्दतीने विचार करेल,असे भाजप आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
आम.नितेश राणे यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी संवाद साधला.ते म्हणाले, जनतेच्या आंदोलनाची शासन दखल घेईल. पण ह्या निमित्ताने राज्य सरकार वर टिका करणाऱ्या संजय राऊत यांनी थोडे तरी त्यांच्या मालकाच्या मुलाच्या कारणाम्याकडे बघितले असते तर ‘हिट ॲन्ड रन’बद्दल बोलण्याची त्यांची हिंमत झाली नसती. त्या दिशा सालीयान केसमध्ये कोणी बॉडी कुठे टाकली आणि कसे तिथून पळुन गेले हे आता पोलिस चौकशीमध्ये बाहेर येणारच आहे. त्यामुळे हिट अन्ड रन केसवर बोलण्याचा नैतिक अधिकार संजय राऊत आणि त्याच्या मालकाला नाही.

भांडुप मध्ये बसुन सोम्या गोम्यानी महाविकास आघाडी आणि बैठकीतील वाटपाबद्दल बोलु नये . तुमची लायकी किती आहे हे तुम्हालाच माहित आहे. तुमच्या मालकाला कॉंग्रेस पक्ष श्रेष्ठीनी खडसावलंय त्याची बातमी आमच्याकडे आहे. उध्दव ठाकरेंना म्हणे सक्त आदेश १० जनपथच्या मातोश्रींकडून आले आहेत. संजय राऊताचे थोबाड बंद करा म्हणून तंबी मिळाली आहे. म्हणून जागा वाटपाच्या चर्चेच्या मोठ्या मोठ्या बाता करण्याअगोदर तुमच्या मालकाची थोडी काही इज्जत जर ठेवायची असेल तर , दरदिवशी सकाळीच उघडणारे थोबाड बंद करा आणि एकदाचे घरी बसा,असा सल्लाही संजय राऊत यांना नितेश राणे यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page