‘ती’ जागा आमचीच…

मंत्री उदय सामंत: मात्र, याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील; तिन्ही पक्षात कटुता येणार नाही!

⚡सावंतवाडी ता.०२-: भाजपने रत्नागिरी- सिंधुदुर्गवर दावा केला आहे. मात्र, ती जागा शिवसेनेचे आहे. यामुळे आम्हाला या जागेवर दावा करण्याची गरज नाही तो आमचाच आहे.मात्र,हे सर्व निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असे वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.दरम्यान तीन पक्षांमध्ये कटूता येणार नाही हे भूमिका प्रत्येकाने घेतली पाहिजे असे ही उदय सामंत यावेळी बोलतान म्हणाले.ते सावंतवाडीत शिव संकल्प अभियान नियोजन सभेत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.

यावेळी सामंत पुढे म्हणाले की दीपक केसरकर यांनी चांदा ते बांदा योजना आणून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला सर्वाधिक निधी दिला आहे असा दावा देखील उदय सामंत यांनी केला. तसेच आपली ताकद समोरच्याना दिसली पाहिजे यासाठी प्रत्येकाने संघटनात्मक काम करून आपल्या पक्ष्याची ताकद वाढवली पाहिजे असे सामंत यावेळी पदाधिकाऱ्यांना संबंधित करताना म्हणाले.दरम्यान आज जानेवारीला मुख्यमंत्री यांची राजापूर येथे होणारी शिवसंकल्प अभियानाला होणारी गर्दी लोकसभेची नांदी ठरली पाहिजे त्यासाठी एक तास पक्ष्यांसाठी वेळ द्या असे आवाहन देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

You cannot copy content of this page