⚡बांदा ता.०२-: जागतिक आरोग्य संघटनेचे माजी सल्लागार (कै.) डॉ. बी. बी. गायतोंडे यांची जयंती येथील नट वाचनालयात साजरी करण्यात आली.
यावेळी वाचनालयचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांनी डॉ. गायतोंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहिला. यावेळी वाचनालयचे उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक प्रकाश पाणदरे, जगन्नाथ सातोसकर, अनंत भाटे, ग्रंथपाल प्रमिला मोरजकर, सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू आदिसह वाचक उपस्थित होते.
यावेळी श्री भाटे व श्री सावंत यांनी डॉ. गायतोंडे यांच्या अनेक आठवणीना उजाळा दिला. तसेच त्यांचे आरोग्य क्षेत्रातील जागतिक स्तरावरील योगदान व बांदा गावातील शैक्षणिक चळवळ याबाबत सविस्तर माहिती दिली.
फोटो:-
बांदा नट वाचनालयात डॉ. गायतोंडे यांना अभिवादन करताना मान्यवर.
