जिल्ह्यात कोणीही कितीही उद्घाटना केली तरी निधी हा पालकमंत्र्यांच्या माध्यमातूनच…

राजन तेली: राज्यात सत्तेचा विचार करता एकत्र भूमिपूजन केल्यास चांगले; दीपक केसरकरांना टोला..

सावंतवाडी ता.०२-:सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास कामासाठी मिळणारा निधी हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याच माध्यमातून मिळत आहे त्यामुळे कोणी कितीही भूमिपूजन आणि उद्घाटने केली तरी येथील जनता फसणार नाही असा टोला माजी आमदार राजन तेली यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता लगावला. तर राज्यात एकत्र सत्तेत असल्याने जिल्ह्यातील विकास कामांची उद्घाटने एकत्र येऊन केल्यास चांगले होईल असा सल्लाही त्यांनी दिला.


श्री तेली यांनी आज विधानसभा कार्यालयात पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते त्यांच्यासोबत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजू परब माजी नगरसेवक आनंद नेवगी युवा मोर्चा चिटणीस बंटी पुरोहित निशांत तोरस्कर आधी उपस्थित होते.

तेली पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन डोंगरी विकास आणि 25 15 च्या माध्यमातून तब्बल 19 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे या ठिकाणी डोंगरी विकासच्या माध्यमातून जिल्ह्यातील किनारपट्टीला निधी मिळत नव्हता परंतु यावेळी हा निधी किनारपट्टीला देण्याचा प्रयत्न आहे तसेच जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेतील एकही गाव या विकास निधीपासून चुकू नये याची खबरदारी ही घेतली जात आहे मुळात जिल्हा नियोजन च्या माध्यमातून गेल्यावर्षी आणि यावर्षीही प्रत्येक ग्रामपंचायतीला विविध विकास कामांसाठी पैसे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पोचले आहेत गावागावातून जनतेच्या अनेक मागणी आहेत सगळ्या पूर्ण करण्यासाठी तेथील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत यावर्षी बजेटच्या माध्यमातून कामांना निधी मिळावा त्यासाठी प्रयत्न आहेत मुळे अजून विकास कामे मार्गी लागणार आहेत.


श्री तेली पुढे म्हणाले आज राज्यात एकत्र सत्तेत असताना मित्र पक्षांकडून विकास कामाचे भूमिपूजन करताना भाजपच्या कार्यकर्त्यांना डावलले जात आहेत मात्र विकास कामांना मिळणारा निधी हा पालकमंत्र्यांच्याच सहीने मिळतो हे न समजण्याएवढी येथील जनता खुळी नाही. त्यामुळे कोणी कितीही उद्घाटने केली तरी जनता फसणार नाही. मुळात जिल्ह्याचा विकास करत असताना राज्यातील एकत्ररित्या असलेल्या सत्तेचा विचार करता येथील आमदार तथा शालेय शिक्षण मंत्र्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन एकत्ररित्या भूमिपूजन केली पाहिजे. तसे झाल्यास निश्चितच चांगले होईल. आज जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न बिघडला असला तरी लवकरच तो सुधारला जाईल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून याकडे बारकाईने लक्ष दिला जात आहे त्यामुळे त्यामुळे लवकरच येथील जनतेला चांगली आरोग्य सुविधा निश्चितच मिळणार आहे दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून काम करणाऱ्या अनेक ठेकेदारांना त्यांनी केलेल्या कामांची बिले मिळत नसतील तर त्यांनी पुढे येणे गरजेचे आहे आम्ही याबाबत निश्चितच तोडगा काढू

चौकट
तत्कालीन पाकमंत्र्याकडून अन्याय..

जिल्ह्याचे पालकमंत्री असताना दीपक केसरकर यांनी युतीधर्म न पाळता भाजपा कार्यकर्त्यांवर निधी वाटपात अन्याय केला होता परंतु आताचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे
निधी वाटपात सर्वांना समान न्याय देत आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा विकास हा रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातूनच होत असल्याचे राजन तेली म्हणाले.

You cannot copy content of this page