Headlines

Global Maharashtra Breaking News

कुडाळ शहरातील सर्व शाळा व शासकीय इमारतींमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’करा…

मंदार शिरसाट यांची जिल्हाधिकरी तृप्ती धोंडमीसे यांच्याकडे मागणी.. ⚡कुडाळ ता.१४-: शहराचा वाढता विस्तार आणि वाढत्या शहरीकरणामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी कुडाळ शहरातील सर्व शाळा आणि शासकीय आस्थापनांमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ (Rain Water Harvesting) बंधनकारक करण्यात यावे, अशी आग्रही मागणी शिवसेना युवासेनेचे माजी उपनगराध्यक्ष व गटनेते मंदार श्रीकृष्ण शिरसाट…

Read Full News

स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर..

आनंद धोंड यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी: तर सचिव पदी साबाजी परब यांची निवड. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१४-: पत्रकारांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण, त्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणे आणि पत्रकारितेचा स्वाभिमान जपण्यासाठी कटिबद्ध असलेल्या स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत कोकण दर्शन डिजिटल मीडियाचे संपादक तथा गेली अनेक वर्षे पत्रकारिता…

Read Full News

आमदार निलेश राणेंच्या प्रयत्नांतून महिला रुग्णालयातील त्या ५२ कर्मचाऱ्यांना दिलासा…

थकीत ३६ लाख वेतन अदा होणार, सोबत सप्टेंबर पर्यंतची मुदतवाढ.. ⚡कुडाळ ता.१४-: येथील महिला बालरूग्णालयात काम करणाऱ्या ५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या निविदेची मुदत संपल्यामुळे महिला रुग्णालय येथे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे मिळून ३६ लाख रुपये वेतन अदा झाले नव्हते सोबतच नवीन नियुक्ती किंवा मुदतवाढ मिळाली नव्हती, या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री…

Read Full News

गरजू विद्यार्थ्यांप्रती सामाजिक बांधिलकी जपत श्री शिवशंभू ग्रुपचा स्तुत्य उपक्रम

रोणापाल येथील दयासागर छात्रालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप सावंतवाडी : सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रप्रेमाची जपणूक करत विविध विधायक उपक्रम राबविणाऱ्या मळगाव येथील श्री शिवशंभू ग्रुपने पुन्हा एकदा आपल्या सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे. उत्सव साजरे करण्याबरोबरच समाजातील गरजू घटकांच्या पाठीशी उभे राहण्याची परंपरा जपत मंडळाने रोणापाल येथील दयासागर छात्रालयातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

Read Full News

५७ कोटींच्या नळपाणी योजनेवर ठेकेदाराची चिरफाड…

निकृष्ट काम, समन्वयाचा अभाव आणि २८ कोटींच्या देयकांवर नगरसेवकांचा संताप; ‘थर्ड पार्टी ऑडिट’ अहवाल विशेष सभेत मांडण्याचे निर्देश.. ⚡सावंतवाडी ता.१४-: नगरपालिकेच्या ५७ कोटींच्या नळपाणी योजनेच्या कामात ठेकेदाराकडून झालेली दिरंगाई, निकृष्ट दर्जा आणि समन्वयाचा अभाव यावरून उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांसह सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी संताप व्यक्त करत ठेकेदाराच्या कामाची चिरफाड केली. पालकमंत्री…

Read Full News

वनराई सारथेसोबत विद्यार्थ्यांनी अनुभवली बांधावरची शाळा

भातलावणीचा घेतला प्रत्यक्ष आनंद कणकवली : शेतीविषयी लहान वयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी, आधुनिक शेतीची माहिती मिळावी आणि कृषी संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने श्री स्वयंभू विद्यामंदिर, कणकवली शाळा क्रमांक २ च्या विद्यार्थ्यांसाठी “वनराई सारथे” उपक्रमांतर्गत बांधावरच शाळा भरविण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून भातलावणीचा आनंद घेतला. या उपक्रमात विद्यार्थ्यांना भात शेतीची संपूर्ण प्रक्रिया…

Read Full News

ओरोस येथे एनसीसी प्रशिक्षण शिबीर संपन्न

मालवण (प्रतिनिधी) ५८ महाराष्ट्र बटालियन, सिंधुदुर्ग यांच्यावतीने ओरोस येथे आयोजित दहा दिवसीय संयुक्त राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) प्रशिक्षण शिबिराचा शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. या शिबिरात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ३७० एनसीसी कॅडेट्सनी सहभाग घेत विविध लष्करी आणि व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षणाचा लाभ घेतला. या शिबिरात कंम्बाईन्ड अॅन्युअल ट्रेनिंग कॅम्प, रिपब्लीक डे कॅम्प आणि थल…

Read Full News

दशावतार कलाकारांना समाजाने आणि शासनाने अधिक बळ देण्याची गरज…

दत्ता सामंत:मालवणात संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡मालवण ता.१३-:दशावतार ही कोकणची अमूल्य सांस्कृतिक परंपरा असून दशावतार म्हणजे कोकणच्या संस्कृतीचा आत्मा आहे. या कलेचा वारसा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. अनेक कलाकार प्रतिकूल परिस्थितीत ही कला जिवंत ठेवत आहेत. अशा कलाकारांना समाजाने आणि शासनाने अधिक बळ देण्याची गरज आहे, कलाकारांचा सन्मान, त्यांच्या संघर्षाची दखल आणि…

Read Full News

नोंदणीकृत कामगारांना लाखोंचे आर्थिक संरक्षण…

चार सुधारित योजनांचे शासन निर्णय जारी: श्रीहरी चव्हाण यांची माहिती.. ⚡मालवण ता.१३-: केंद्र शासनाने जुने २९ कामगार कायदे निरसित करून संपूर्ण देशात २१ नोव्हेंबर २०२५ पासून लागू केलेल्या ‘सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने कामगार वर्गासाठी एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा’च्या अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या…

Read Full News

जनतेचा विरोध असेल तर आजगाव-धाकोरे मायनिंगलाही विरोध…

मंत्री उदय सामंत:आडाळी उत्खननातील दोषींवर गुन्हे दाखल करणार.. ⚡सावंतवाडी,ता.१३-: स्थानिक जनतेचा विरोध लक्षात घेता आजगाव-धाकोरे येथील मायनिंग प्रकल्पाला आमचाही पूर्ण विरोध राहील, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. याचवेळी सावंतवाडीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी आडाळी एमआयडीसी येथील चुकीच्या उत्खनन प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणाची सध्या राज्याच्या सचिव स्तरावर सखोल चौकशी सुरू…

Read Full News

You cannot copy content of this page