Headlines

Global Maharashtra Breaking News

जुनाबार होळीचा खुंट येथील गटार व रस्ता डांबरीकरणाच सुधीर आडीवरेकर यांच्या हस्ते शुभारंभ…

सावंतवाडी : जुनाबार होळीचा खुंट येथील नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी गटार व रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सावंतवाडी नगरपरिषदेअंतर्गत हा निधी देण्यात आला होता. या निधी अंतर्गत होणाऱ्या विकासकामाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष संजू परब व माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक…

Read Full News

वैभववाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी आर डी जंगले…

वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी श्री. रामचंद्र उर्फ आर डी जंगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडून नुकतेच प्राप्त झाले आहेत. गेली अनेक वर्ष वैभववाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी पदाची धुरा जयप्रकाश परब यांनी पारदर्शकपणे सांभाळली होती. परब यांची पदोन्नतीने भंडारा येथे बदली झाली. त्यानंतर…

Read Full News

राजेश जाधव यांना शासनाचा डॉ आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान…

⚡सावंतवाडी ता.१६-: ओटवणे येथील सामाजिक कार्यकर्ते गुंडू उर्फ राजेश सदाशिव जाधव यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत देण्यात येणारा यावर्षीचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार राज्याचे पर्यावरण पाणी पुरवठा स्वच्छता तथा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. मुंबई नरिमन पॉईंट येथील जमशेद भाभा नाट्यगृह येथे आयोजित करण्यात…

Read Full News

वाफोली गावात विविध विकासकामांचा राजन तेली यांच्या हस्ते शुभारंभ…

⚡बांदा ता.१६-: वाफोली गावात विविध विकासकामांचा शुभारंभ श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.वाफोली जि. प. शाळा नंबर १ च्या छप्पर दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन मधून १० लाख रुपये पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मंजुर झाले आहेत. या कामाचा शुभारंभ माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.वाफोली मधली वाडी ते नदी पर्यंत जाणाऱ्या रस्त्यासाठी…

Read Full News

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी मी सुद्धा इच्छुक…

विशाल परब:उमेदवारीसाठी कोणीही इच्छुक;पक्षाकडून जो उमेदवार देणार तो निवडून आणण्यासाठी मी माझी जबाबदारी ओळखून काम करणार.. ⚡सावंतवाडी ता.१६-: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी मी सुद्धा इच्छुक आहे तशा प्रकारची मागणी ही आपण पक्षाकडे केली आहे, उमेदवारीसाठी कोणीही इच्छुक असू शकतो त्यात काहीही गैर नाही मात्र पक्षाकडून जो उमेदवार निश्चित केला जाईल…

Read Full News

महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर शिवसेना पक्षात असंख्य कार्यकर्त्यांचा जंबो पक्षप्रवेश…

सिंधुरत्न समिती संचालक श्री.किरण उर्फ भैय्या सामंत. यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश.. ⚡कुडाळ ता.१६-: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर,श्री.किरण उर्फ भैय्याशेठ सामंत, यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून झाराप येथे शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.हा प्रवेश सिंधुरत्न समिती संचालक श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संजय आंग्रे,खजिनदार…

Read Full News

विशाल परब यांनी सावंतवाडी नवनिर्वाचित पोलीस निरीक्षकांची घेतली भेट…

⚡सावंतवाडी ता.१६-: येथील युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांनी आज सावंतवाडी पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांची भेट घेण्यात आली. यावेळी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी. तेजस माने प्रशांत पाटील विकास परब आदी उपस्थित होते.

Read Full News

बांदा -सावंतवाडी इन्सुली मार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात….

एसटी बसला ट्रक व डंपर ने दिली जोरदार धडक: ट्रकच्या मोठ्या प्रमाणात नुकसान.. ⚡बांदा ता.१६-: बांदा सावंतवाडी मार्गावर इन्सुली सोहिरोबानाथ आंबीये मंदिर समोर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. उभ्या असलेल्या एसटी बसला पाठीमागून ट्रक व डंपरने जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. हा अपघात दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास झाला.सावंतवाडी दोडामार्ग एसटी…

Read Full News

निलेश राणें मुळेच मी समाजकारणात…

विशाल परब:वाढदिवसानिमित्त निलेश राणे यांना दीर्घायुष्य लाभो.. ⚡सावंतवाडी ता.१६-: राजकारणात व समाजकारणात ज्यांच्यामुळे आम्ही घडलो त्या आदरणीय निलेश राणे यांचा वाढदिवस उद्या साजरा होत आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा भाजपा महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिल्या.

Read Full News

बांद्यात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

२८ दात्यांनी केले रक्तदान:बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते शुभारंभ.. ⚡बांदा ता.१६-: रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथ बांदा, रोटरी क्लब ऑफ बांदा तसेच सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा केंद्रशाळेत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २८ दात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उदघाटन बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला…

Read Full News

You cannot copy content of this page