वैभववाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी आर डी जंगले…

वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी श्री. रामचंद्र उर्फ आर डी जंगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडून नुकतेच प्राप्त झाले आहेत.

गेली अनेक वर्ष वैभववाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी पदाची धुरा जयप्रकाश परब यांनी पारदर्शकपणे सांभाळली होती. परब यांची पदोन्नतीने भंडारा येथे बदली झाली. त्यानंतर वैभववाडी पंचायत समितीचा अतिरिक्त कार्यभार कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने अरुण चव्हाण यांच्याकडील गटविकास अधिकारी वैभववाडी या पदाचा अतिरिक्त कार्यभार कमी करण्यात आला आहे. त्याऐवजी सहाय्यक गटविकास अधिकारी गट ब पंचायत समिती वैभववाडी श्री. रामचंद्र जंगले यांच्याकडे पंचायत समिती वैभववाडी गटविकास अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. श्री जंगले यांना गटविकास अधिकारी पंचायत समिती वैभववाडी या पदाचे आहरण व संवितरणासह सर्व अधिकार प्रदान करण्यात येत आहेत असे आदेशात नमूद करण्यात आले आहेत.

You cannot copy content of this page