सावंतवाडी : जुनाबार होळीचा खुंट येथील नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी गटार व रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सावंतवाडी नगरपरिषदेअंतर्गत हा निधी देण्यात आला होता. या निधी अंतर्गत होणाऱ्या विकासकामाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष संजू परब व माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, नासीर शेख, केतन आजगावकर, महेश पांचाळ, परिक्षीत मांजरेकर, सुकन्या टोपले, विनोद सावंत, हेमंत बांदेकर, नागेश जगताप, महेश बांदेकर, श्री. नेवगी, श्री.बांदेकर आदी उपस्थित होते.
