Headlines

Global Maharashtra Breaking News

मराठा समाजाची मोटरसायकल रॅलीच्या नियोजनासाठी रविवारी सायंकाळी आर पी डी स्कूल मध्ये बैठक…

सिताराम गावडे:मराठा बांधव, भगिनींनो मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे केले आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.०३-: सावंतवाडी मराठा समाज भव्य मोटरसायकल रॅली बुधवार दि.८ नोव्हेंबर रोजी सावंतवाडी शहरातून काढण्यात येणार आहे. त्यासाठी सकाळी १० वाजता राजवाडा येथे जमणार आहोत. याचे नियोजन रविवारी सायंकाळी पाच वाजता आर पी डी हायस्कूल मध्ये बैठकीत करण्याचे ठरविण्यात आले आहे. मराठा बांधव, भगिनींनो मोठ्या…

Read More

परब कुटुंबियांना भाजपच्या माध्यमातून दोन लाखांची आर्थिक मदत…

शॉर्टसर्किटमुळे आग लागून झालेत होते नुकसान: माजी खासदार निलेश राणे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मदत.. ⚡मालवण ता.०३-: मालवण तालुक्यातील कातवड येथील रवींद्र परब यांच्या घरास दोन दिवसांपूर्वी शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. याबाबत पालकमंत्र्यांना माहिती मिळताच भाजपच्या माध्यमातून परब कुटुंबियांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर…

Read More

मडुऱ्यात दोन कोटींचा बंधारा होणार

शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव सादरकरण्याच्या सूचना : लघु पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी.. ⚡बांदा ता.०३-: मडुरा नदीवर लघुपाटबंधारे विभागाचा सुमारे ७० वर्षांपूर्वीचा बंधारा पूर्णपणे जीर्ण झाला आहे. त्यामुळे मडुरा – सातोसे सीमेवरील नदीपात्रात लघुपाटबंधारे विभागाचा सुमारे दोन कोटी रुपये खर्चून कोल्हापुरी पद्धतीचा सिमेंट बंधारा होणार आहे. लपाचे उपविभागीय जल संधारण अधिकारी आर. टी. धोत्रे यांनी नुकतीच बंधारा स्थळाची…

Read More

मिंधे सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कुचकामी ठरले…

रियाज खान:मनोज जरांगे पाटील व समस्त मराठा समाजाच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा असल्याच केले जाहीर.. ⚡बांदा ता.०३-: राज्यातील मिंधे सरकार हे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कुचकामी ठरले आहे. मराठा समाजासोबत अल्पसंख्यांक समाजाच्या तोंडाला देखील या सरकारने पाने पुसण्याचीच कामे केली आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील व समस्त मराठा समाजाच्या भूमिकेला आमचा जाहीर पाठिंबा असल्याचे शिवसेना अल्पसंख्यांक…

Read More

डीगसमध्ये राईत पावणे दोन लाखांची दारू पकडली…

एक्साईजच्या सिंधुदुर्ग भरारी पथकाची कारवाई;एकाला घेतले ताब्यात.. ⚡बांदा ता.०३-: डिगस (ता. कुडाळ) येथे घराच्या बाजूस राईमध्ये लपवून ठेवलेल्या दारू साठ्यावर सिंधुदुर्ग भरारी पथकाने शुक्रवारी कारवाई केली. काळया प्लॅस्टिकच्या कागदाखाली ३५ कागदी पुठ्ठ्यांमध्ये लपवून ठेवलेली १ लाख ६८ हजारांची दारू जप्त केली. याप्रकरणी ओंकार इंद्रजित सावंत (२६, रा. डिगस गोरीवलीवाडी) याला ताब्यात घेण्यात आले.       याबाबत अधिक…

Read More

अ भा अं नि समितीची रविवारी सभा…

⚡मालवण ता.०३-: अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गची कार्यकारीणीची सभा अँड. राजीव बिले यांचे अध्यक्षते खाली रविवार दि ५ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ठिक ३ वा . संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळ येथे आयोजित केली आहे . या सभेमध्ये जिल्हा कार्यकारीणीचा विस्तार करणे आणि जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा जादूटोणा विरोधी कायदाची प्रात्यक्षिकासह कार्यशाळा आयोजित करण्यासंबंधी नियोजन…

Read More

सायबर सुरक्षेअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०३-: ऑक्टोबर महिना हा “वर्ल्ड सायबर सिक्युरीटी अवेअरनेस मंथ ” म्हणून गणला जातो. जिल्ह्यामधील शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्थेतील विदयार्थी जे मोबाईल इंटरनेटचा जास्त वापर करतात. देशाच्या भावी पिढीला “सायबर सिक्युरीटी व जनरल अवेरनेस” बाबत अवगत करण्यासाठी कार्यक्रम आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी. जेणेकरून तरूण पिढी स्वत:चे व आपल्या परीवाराचा संभाव्य सायबर गुन्ह्यांपासून काही…

Read More

मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची ५ रोजी सभा…

⚡मालवण ता.०३-: मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची मासिक सभा दि. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मालवण येथील टोपीवाला हायस्कुल मध्ये आयोजित करण्यात आली आहे. पदाधिकारी व सदस्यांनी सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाचे अध्यक्ष मंगेश शेर्लेकर व सचिव दामोदर गवई यांनी केले आहे.

Read More

कातवड येथील परब कुटुंबीयांना आमदारांकडून आर्थिक मदत सुपूर्द…

⚡मालवण ता.०३-: मालवण तालुक्यातील कातवड येथील रवींद्र परब यांच्या घरास दोन दिवसांपूर्वी शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी आज परब कुटूंबीयांची भेट देऊन नुकसानीची माहिती घेत आर्थिक मदत केली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबी जोगी, मंदार केणी, मंदार ओरसकर, सरपंच सिया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर यांच्यासह अन्य…

Read More

न्याय हक्कांसाठी पारंपारिक मच्छीमारांचे १६ नोव्हेंबरपासून उपोषण

⚡मालवण ता.०३-: सिंधुदुर्गच्या समुद्रात सुरु असलेल्या अनधिकृत पर्ससीन मासेमारीवर कारवाई साठी पारंपारिक मच्छिमार गेली अनेक वर्षे मत्स्य व्यवसाय विभागाकडे मागणी करत असताना मत्स्य अधिकारी कारवाई करत नाहीत. पर्ससीन मासेमारीमुळे पारंपारिक मच्छिमारांना मासा मिळेनासा झाला आहे. त्यामुळे पर्ससीनवर कारवाईसाठी आणि आमच्या न्याय हक्कासाठी दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०. ३० वाजल्यापासून मत्स्य कार्यालयासमोर उपोषणास बसणार, असा…

Read More
You cannot copy content of this page