मालवण मेढा येथील श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रम…

⚡मालवण ता.०८-: मालवण मेढा येथील श्री राम मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्त दि. ९ ते २३ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त दि. ९ ते १६ एप्रिल या कालावधीत रोज सायंकाळी ७.३० वा. पालखी, दि. १२ रोजी सायंकाळी ६ ते ७ यावेळेत निवडक गीत रामायण (सुनील परुळेकर व वाद्यसमूह), दि. १३ ते १५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते ७ यावेळेत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या अनुग्रहित सौ. सरिता नरसिंह अवधानी उर्फ नामदासी, कोथरूड पुणे यांची प्रवचने सादर होणार आहेत. यामध्ये दि. १३ रोजी राम जीवनी जाणावा, १४ रोजी राम चरणी विसावा, १५ रोजी राम नित्य आचरावा या विषयांवर प्रवचने होणार आहेत.

दि. १६ एप्रिल रोजी रात्री ८ वा. ह.भ.प. निशिकांत टेंगसे बुवा (गोवा) यांचे कीर्तन, १७ रोजी राम नवमी – राम जन्मोत्सव, सकाळी ११ वा. ह.भ.प. निशिकांत टेंगसे बुवा यांचे राम जन्मोत्सव कीर्तन, दि. २३ एप्रिल रोजी सकाळी श्री हनुमान जन्मोत्सव, आणि ह. भ. प. श्रीकृष्ण सामंत बुवा (वेताळ बांबर्डे) यांचे हनुमान जन्मोत्सव कीर्तन होणार आहे. तरी सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page