वेंगुर्ले शहरात रंगात रंगले अबालवृद्ध…

रंगपंचमी उत्‍साहात: शिमगोत्सवाची सांगता..

⚡वेंगुर्ले ता.०८-: वेंगुर्ले शहरात आज पंधरा दिवसांची रंगपंचमी उत्‍साहात साजरी करण्यात आली. सकाळ पासून अबालवृद्ध विविध रंगात रंगले होते. सायंकाळी उशिरा पर्यंत ही रंगपंचमी साजरी करत शिमगोत्सवाची सांगता करण्यात आली.
‘रंगात रंगू या सारे’ असे म्हणत वेंगुर्ले शहरात विविध रंगांची उधळण करीत आज रंगपंचमी उत्‍साहात साजरी करण्यात आली. या रंगपंचमीने येथील शिमगोत्सवाची पारंपारिक पध्दतीने सांगता झाली. रंगपंचमी खेळताना बच्चे कंपनीबरोबरच तरुणाईचाही उत्साह दांडगा होता.
वेंगुर्ले शहरात गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. शहरात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रंगपंचमीला सुरुवात झाली. तर सायंकाळी उशिरा पर्यंत ही रंगपंचमी सुरू होती. रात्री उशिरा श्री. पुर्वस मंदिराजवळील गाव होळी जवळ परंपरागत पध्दतीने काही धार्मिक विधी पार पड़ल्यानंतर आणि सामूहिक गाऱ्याण्या नंतर शिमगोत्सवाची सांगता होणार आहे.

You cannot copy content of this page