राधाकृष्ण नृत्य रोंबाट स्पर्धेत गणेशकृपा संघ प्रथम…

गावडोबा कलेश्‍वर संघ द्वितीय, गजानन भजन मंडळ तृतीय ः कलाविष्कार ठरले लक्षवेधी..

⚡कणकवली ता.०८-: कै. सुरेश धडाम यांच्या स्मृतिनिमित्त महापुरुष मित्रमंडळाने झेंडा चौकात आयोजित केलेल्या राधाकृष्ण नृत्य रोंबाट स्पर्धेत विविध संघांनी सादर केलेले कलाविष्कार लक्षवेधी ठरले. या स्पर्धेत गणेशकृपा तेंडोली-कुडाळ संघाने प्रथम क्रमांक मिळवला. गावडोबा कलेश्‍वर राईचीवाडी संघाने द्वितीय तर गजानन भजन मंडळ, नेरूर-कुडाळ संघाने तृतीय क्रमांक मिळवला.
या स्पर्धेचा शुभारंभ मंडळाचे माजी अध्यक्ष राजेश सापळे व वारकरी विलास बिडये यांच्या हस्ते झाला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी, उपाध्यक्ष राजन पारकर, खजिनदार मंदार सापळे, नीलेश धडाम, राजू मानकर, उदय मुंज, साई अंधारी, सौरभ पारकर, महेंद्र सांबरेकर, मुकुंद खानोलकर, बाळा सापळे, काशिनाथ कसालकर, महेंद्र अंधारी, बंड्या पारकर, दादा मुंज, हरिष उचले, हर्षल अंधारी, संदीप अंधारी, प्रद्युम मुंज, चेतन अंधारी, सोहम वाळके, प्रज्वल वर्दम, संजय मालंडकर, स्वप्नील मेनकुदळे, रुद्र सापळे, नाना सापळे, चेतन मुंज, दत्ता तोरसकर आदीसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खो…खो… खेळ खेळती संवगडी…. क्षण हा आनंदाचा….सण हा होळीचा…. खेळ रंगला शिमग्याचा या गौळण व भारूडावर पौराणिक कथा, साहित्यावर आधारित टिकसीनयुक्त चित्ररथ देखावे, कालकारांनी केलेली पारंपरिक वेशभूषा, विविध सोंगांसह खेळांच्या सादरीकरणाने रसिक भारावून गेले. स्पर्धेचे परीक्षण प्रा. हरिभाऊ भिसे यांनी केले. स्पर्धा पार पडल्यानंतर विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले.

You cannot copy content of this page