रुपेश पावसकर:किरण सामंत यांनी दोन्ही जिल्ह्यात विविध कामे केली आहेत…
⚡कुडाळ ता.०८-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार हा शिवसेनेचा द्यावा, अशी शिवसैनिकांची मागणी असल्याचे शिवसेनेचे रुपेश पावसकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर …आदी उपस्थित होते.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. किरण सामंत यांनी दोन्ही जिल्ह्यात विविध कामे केली आहेत. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांमध्ये त्यांना मानणारा वर्ग आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निवडणूक लढवेल, असा दावा राणे यांनी केला आहे. त्यांचा हा दावा वैयक्तिक स्वरुपातील आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
