बांदा/प्रतिनिधी
गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर मार्फत घेण्यात आलेल्या ‘गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा’ (G.T.S) मध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नं. ५ ने घवघवीत यश संपादन केले आहे.
उमंग योगेश मुळीक इयत्ता पहिली हा विद्यार्थी ८८ गुण मिळवून राज्यात सातवा आला. देवांश दीपक पडवळ इयत्ता दुसरी हा ९० गुण मिळवून राज्यात पाचवा आला. पल्लवी प्रल्हाद सावंत इयत्ता दुसरी ही विद्यार्थिनी ७६ गुण मिळवून राज्यात बारावी आली. सोहा इमदादखान बिजली इयत्ता पाचवी हिने ३०० पैकी २८२ गुण मिळवून राज्यात चौथी आली. सिया विवेकानंद नाईक, इयत्ता पाचवी ही ३०० पैकी २८० गुण मिळवून राज्यात पाचवी आली.
या विद्यार्थ्यांना शाळेचे शिक्षक हंसराज गवळे, सुधीर गावडे, भास्कर माजगावकर व शाळेचे मुख्याध्यापक धनंजय केरकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विवेकानंद नाईक व सर्व पदाधिकारी, इन्सुली गावचे उपसरपंच कृष्णा सावंत तसेच इन्सुली केंद्रप्रमुख लक्ष्मीदास ठाकूर सावंतवाडीच्या गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
फोटो :-
इन्सुली येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. ५ मधील विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना शिक्षक.
